खैरे, आढळराव-पाटील, अनंत गिते यांना आराम; तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाणार?
मुंबई : एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत आहेत. मात्र शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केल्याचीही माहिती होती. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट आदित्य ठाकरे यांच्यामार्फत ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या सर्वात पुढे दिसतात.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या ‘आदित्य संवाद’ या इव्हेंटमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांची प्रमुख भूमिका होती आणि त्या सतत आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळालं होतं . नुकतीच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या कार्यालयांना भेट दिली होती आणि त्यावेळी देखील प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होत्या. दिल्लीत पक्षाची इमेज बिल्डिंग करण्याच्या दृष्टीने पारंपरिक उमेदवारांना बगल देत, हिंदी, इंग्लिश अशा भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या आणि सर्वच पक्षांना परिचित असणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे पुढाकार घेण्याची शक्यता होती.
आदित्य ठाकरे सध्या पर्यावरण या विषयांवरून निरनिराळ्या देशांच्या राजदूतांच्या भेटी घेत असून त्यात देखील प्रियांका चतुर्वेदी महत्वाची भुमीका बजावत आहेत. अप्पर मिडल क्लासमध्ये शिवसेनेबद्दल काहीशी नाकाराम्तक विचारधारणा आहे आणि ती देखील बदलण्याचा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न दिसतो. त्यासाठी आवश्यक असणारे चेहरे समोर आणणे आणि राज्यसभेत पक्षाची निरनिराळया विषयावरून वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा आदित्य ठाकरे यांचा निश्चय दिसतो आणि त्यामुळे त्यांचा एकूण दिनक्रम पाहिल्यास ‘इमेज बिल्डिंग’ त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं दिसतं.
अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असाही पक्षात मतप्रवाह आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत आहेत. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक असल्याची चर्चा आहे. मात्र आदित्य ठाकरे प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी आग्रही असल्याचं वृत्त आहे.
महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची मुदत पुढील महिन्यात संपत असून, त्या जागांसाठी २६ मार्चला मतदान होईल. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे या निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष आहे. महाराष्ट्राच्या २८८ जणांंच्या विधानसभेत भाजपचे १०५, शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ व काँग्रेसचे ४४ सदस्य आहेत. ही संख्या २५९ होते. या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मताला सर्वाधिक महत्त्व असल्याने पहिल्या पसंतीचे मत आपल्याला मिळावे, यासाठी राजकीय समीकरण निश्चित केले जात आहे.
News English Summery: Shiv Sena is looking for a seat in the April Rajya Sabha elections. Priyanka Chaturvedi, who came to the Shiv Sena from the Congress during the Lok Sabha elections, is keen to step into Parliament. However, the old leaders of the Shiv Sena who lost in the Lok Sabha elections are also in the race. However, the names of Priyanka Chaturvedi were sealed by Shiv Sena, sources said. Shiv Sena leader Priyanka Chaturvedi was said to be keen to contest the Rajya Sabha elections. It was also known that Chaturvedi started trying. In particular, Priyanka Chaturvedi is considered a close relative of Eco-Tourism Minister Aditya Thackeray. Chaturvedi ‘fielding’ directly through Aditya Thackeray, he appears at the forefront of a Rajya Sabha seat race. Meanwhile, Priyanka Chaturvedi played a leading role in Aditya Thakre’s ‘Aditya Dialogue’ event and she was seen to be constantly with Aditya Thackeray. Recently Aditya Thackeray visited Facebook and Instagram offices in Delhi and Priyanka Chaturvedi was also present at that time. Aditya Thackeray himself was likely to take the initiative for Priyanka Chaturvedi, who is fluent in languages like Hindi, English and all parties familiar with the traditional candidates in favor of building party image in Delhi.
Web News Title: Story Environment minister Aaditya Thackerays trusted Priyanka Chaturvedi will get opportunity on Rajya Sabha from Shivsena.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO