वरळी कोळीवाड्यातील कोरोनाबाधित चौघांपैकी एकजण ट्रॉम्बेला आचारीचं काम करणारा
मुंबई, ३० मार्च: देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण हे आता १०००च्या वर गेले आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २१५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की, पुण्यातील ५, मुंबईतील ३, नागपुरातील २, कोल्हापूर १, नाशिकमधील १ असे एकूण नवे १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. काल (रविवार) राज्यात एकूण २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. एकूण १० नवे रुग्ण काल मुंबईत आढळले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
मात्र आज मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडल्याने मुंबईकरांची झोप उडण्याची शक्यता आहे. वरळीमधील कोळीवाड्यात करोनाचे चार संशयित रुग्ण आढळले असल्याने मुबंई पोलिसांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर सील केला आहे. विशेष म्हणजे यामधील एकजण ट्रॉम्बे येथे कूक म्हणून काम करत होता. त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आलं आहे. तर इतर तिघे जण स्थानिक ठिकाणी काम करत असून जास्त प्रवास करत नाहीत. त्यामुळे यांना लागण नेमकी झाली कशी याची माहिती घेतली जात आहे, अशी माहिती जी दक्षिण वॉर्डचे महापालिक सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.
या रुग्णांपैकी कोणतीही परदेश दौरा केला नव्हता अथवा कोणत्याही कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले नव्हते. तरीही या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या चारही रुग्णांचे वय ५० च्या वर आहे. यातील एक रुग्ण ट्रॉम्बेमधील पीएसयूमध्ये स्वयंपाकाचे काम करत असे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कर्मचार्यांची चाचणी व तपासणी करुन घेण्यास सांगितलं असल्याचं महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले. तसेच इतर तिघेही स्थानिक नोकर्या करतात आणि जास्त प्रवास करत नाहीत. त्यांना कुणामुळे संसर्ग झालाय सांगता येत नाही असं ते म्हणाले.
News English Summary: However, today Mumbai is likely to fall asleep due to a shocking pattern in Mumbai. Mumbai police have sealed the premises to prevent the outbreak as four suspected coronary patients were found in Koliwada in Worli. Notably, one of them was working as a cook at Trombay. All their employees have been asked to undergo a medical examination. The other three are working locally and do not travel much. Therefore, they are being informed about the exact cause of the infection, said Sharad Ughde, Municipal Assistant Commissioner, South Ward.
News English Title: Story four corona virus affected patients caught at Mumbai Worli Koliwada out of them one was working as cook at Trombe News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल