30 December 2024 10:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATAPOWER NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
x

आपण केवळ दंगल झाल्यानंतरच हिंदू असतोः राज ठाकरे

Maha Morcha, Raj Thackeray

मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी होत मोर्चाला पाठिंबा दिला आहे. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.

मनसेच्या महामोर्चात राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारला. यावेळी त्यांनी सीएए-एनआरसी विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना इशारा दिला. तसेच हिंदूवरही भाष्य केले. आपण केवळ दंगल झाली की हिंदू असतो. एरवी तसे आम्हाला जाणवत नसते, असा टोला त्यांनी लगावला.

जे या देशाचेच नाहीत त्यांच्याकडे आपण का पुरावे मागायचे. बॉम्बस्फोट झाला की आपण फक्त मेणबत्त्या काढायच्या. माझ्या महाराष्ट्रातील पोलिसांना ४८ तास मोकळं सोडा. गुन्हेगारी शून्य होईल. घुसखोरांची सफाई आता झालीच पाहिजे. याबाबत राज्य सरकारला सांगून उपयोग नाही. केंद्रालाच सांगायला हवं, असेही त्यांनी यावेळी म्हटलं.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो. देशात अनेक बाॅम्ब ब्लास्ट झाले त्यामागे दाऊद इब्राहीम, त्याला पाकिस्ताननं सांभाळलं. ज्यावेळी केंद्राचे चुकीचे निर्णय झाले त्यावेळी टीका केली,जेव्हा चांगली गोष्ट झाली तेव्हा अभिनंदनही केलं. आज पाकिस्तान टेररीस्टचा अड्डा, लादेनही पाकिस्तानमधे सापडला. कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. यापुढे दगडाला दगड आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल. इतर देशापेक्षा भारताने तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे एकोप्याने राहा, देशाशी वाकडं घेऊ नका. हा देश साफ करावा लागेल. केंद्राला कारवाई करावी लागेल अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकर यांनी कडक इशारा दिला आहे.

२०१२ च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता.ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे. अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे.

 

Web Title:  Story Hindus are not alert they become Hindus only during the riots say MNS Chief Raj Thackeray at Mumbai Maha Morcha.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x