मुंबईत शिवसेना पहिल्या तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर हवीः अजित पवार

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० पर्यंत तर आमदारांची संख्या १० पर्यंत जायला हवी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असली पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
पुढे ते असं म्हणाले की, ‘ये दिवार तुटती क्यू नही…’ असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे. ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है” अशा शब्दात महाविकासआघाडीवर टीका करणाऱ्या व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फुंकले.
मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिवसीय कार्यकर्ता शिबीराचं आयोजन केलं आहे. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरू केली आहे, असे सांगतानाच या सरकारने सत्तेवर येताच मागच्या सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय बदलले आहेत. कदाचित भाजपला हे निर्णय योग्यही वाटत असतील. पण ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत असं देखील अजित पवार म्हणाले.
News English Summery: NCP has started preparations for Mumbai municipal elections. In the coming municipal elections, the number of NCP’s corporators should increase from 8 to 60 and the number of MLAs to 10, appealed the state Deputy Chief Minister Ajit Pawar. He was speaking at an activist guidance camp organized on behalf of the Mumbai regional NCP. Shiv Sena is your friend. He said that Shiv Sena should be number one in Mumbai and NCP should be second. He also indicated that the municipal elections will be contested on behalf of the Alliance for Development.
Web News Title: Story in Mumbai shivsena party should be number 1 and NCP should be on number 2 during BMC corporation election 2020 says Deputy Chief Minister Ajit Pawar.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल