23 December 2024 3:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

Mumbai Police Commissioner Parambir Singh, Mumbai Police Commissioner Sanjay Barve Retired

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची घोषणा करण्यात आली आहे. आज संजय बर्वे निवृत्त झाले त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर परम वीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. परम बीर सिंह हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. आता ते मानाच्या मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी घेत आहेत. परम बीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे हे महत्त्वाचं पद पोलीस महासंचालक दर्जाचंच ठेवण्यात आल्याचं स्पष्ट आहे.

काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील तपास पथकाने सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचीट दिली होती. परमबीर सिंह यांच्याकडे पोलिस दलातील प्रदीर्घ अनुभव आहे. मुंबई पोलिस दलात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांची वर्णी लागली आहे. ठाकरे सरकारने परिपत्रक काढून ही घोषणा केली.

महाराष्ट्र पोलीस दलात गेली ३२ वर्षे अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले परमबीर सिंह हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस दलातील एक कार्यक्षम व धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. विविध ठिकाणच्या पोलीस दलाचे प्रमुख म्हणून अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात त्यांना यश आलं आहे. त्यांनी याआधी ठाण्याचं पोलीस आयुक्तपद भूषवलं आहे. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं ठाणे शहरातील गुन्ह्यांमध्ये १० टक्क्यांची घट झाली होती. तसंच, गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाणही वाढलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी मीरा रोड कॉल सेंटर प्रकरण, सैन्य भरती प्रकरण, अमेरिकेच्या ड्रगविरोधी पथकाने लक्ष घातलेल्या २ हजार कोटींचं ड्रग प्रकरण, बेकायदेशीर कॉल रेकॉर्डिंग अशा अनेक प्रकरणांचा तपास केला.

 

News English Summery: Paramir Singh has been announced as Mumbai Police Commissioner. Param Vir Singh has been appointed to the vacant post after Sanjay Barve retired today. Param Bir Singh was the Director General of the Prevention of Corruption. Now he is taking over the post of Hon’ble Mumbai Police Commissioner. With the appointment of Param Bir Singh, it is clear that this important post has been retained as Director General of Police.

 

Web News Title: Story Maharashtra Anti corruption bureau chief Parambir Singh is new Mumbai Police Commissioner.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x