१४ तारखेनंतर ट्रेन सोडतील असं पिल्लू कुणी तरी सोडलं असावं - मुख्यमंत्री

मुंबई १४ एप्रिल: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांचं लॉकडाऊन आज संपलं. आता 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर राज्यातलं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं.
आपल्या सगळ्यांच्या एकजुटीनेच आपण नक्की जिंकणार आहोत हा आत्मविश्वास मला आहे. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात काहीही विचित्र सुरु नाही हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतं आहे.
आम्हाला गावी जायचे आहे, अशी मागणी करत वांद्रे स्टेशनवर आज शेकडो मजुरांनी धडक दिली व तिथे ठिय्या दिला. लॉकडाऊनविरुद्ध झालेल्या या उठावावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली. ‘क्यों परेशान हो रहे है? असा सवाल करत त्यांनी हिंदीतून संवाद साधत परराज्यातील मजुरांना विश्वास दिला. १४ तारखेला लॉकडाऊन संपेल आणि ट्रेन सोडतील असं पिल्लू कुणी तरी सोडलं असावं आणि त्यातून हा सारा प्रकार घडला असावा असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या सर्वच मजुरांना विनंती केली. तुम्ही येथे पूर्णपणे सुरक्षित आहात. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य मिळून नक्कीच तुमची गावी जाण्याची व्यवस्था करेल असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्याचसोबत संपूर्ण देशात जितक्या चाचण्या झाल्या नाहीत तेवढ्या राज्यात होत आहे, महाराष्ट्र सरकार खंबीरपणे कोरोनाशी मुकाबला करतंय. कोरोनाची लागण झाली म्हणजे संपलं असं नाही. योद्धा तनिष्क मोरे सहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलं. त्याच्या आईशी माझं बोलणं झालं. कोरोनावर मात करु शकतं त्यानंतर ८३ वर्षाच्या आजीला फोन केला त्यांनीही कोरोनावर मात करुन दाखवली आहे. ही लढाई अधिक प्रखरतेने लढण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फॉर्स तयार करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील डॉक्टर्स तज्ज्ञांची टीम बनवली आहे. या आजारातून लोकांना कसं बरं करु शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांची पहिली बैठक माझ्यासोबत झाली आहे अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
News English Summary: The 21-day lockdown ended today to prevent Corona spread. Prime Minister Narendra Modi had announced that the lockdown would be extended till May 3. The Chief Minister had announced two days ago that the lockdown in the state would be extended till April 30. Against that backdrop, he interacted with the public again today.
News English Title: Story Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Facebook live on over corona crisis lockdown News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल