कोरोना चाचणी: घरी क्वारंटाइन केलेल्यांच्या हातावर शाई मारणार: आरोग्यमंत्री
मुंबई, १६ मार्च : मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबईतही कोरोनाव्हायरसचा नवा रुग्ण आढळून आला आहे, ज्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात मुंबईत ४, यवतमाळमध्ये एक आणि नवी मुंबईत एक असे एकूण ६ नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात कोणत्या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे किती रुग्ण आहेत, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39 झाली आहे. #CoronaVirusUpdates pic.twitter.com/lnsyWBrlgA
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 16, 2020
राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे ३८ जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच आता घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. घरी क्वारंटाइन केलेल्या लोकांच्या हातावर एक विशिष्ट शिक्का मारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिक्का मारल्यानंतर हे लोक बाहेर दिसले तर, ते घरी क्वारंटाइन आहेत हे कळू शकेल. अशा लोकांनी घरातच राहावे, असंही टोपे यांनी सांगितलं.
तसेच सरकारी कार्यालयांमधील बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.
News English Summery: After Mumbai, a new Corona Virus has also been found in Navi Mumbai, bringing the number of coronary affected patients to 39 in the state. Today, a total of 6 new patients have been reported in the state, one in Mumbai, one in Yavatmal and one in Navi Mumbai. Health Minister Rajesh Tope has tweeted about the number of corona virus patients in the state. Fear has spread as corona virus patients are found in the state. So far 38 corona patients have been found in the state. Therefore, measures are being taken by the state government at all levels to prevent the spread of the Corona virus. The health minister Rajesh Tope has announced that the quarantined people will be sealed at home. A special seal will be placed on the quarantined people’s hands at home, he said. If these people look outside after sealing, they will know they are Quarantine at home. Such people should stay in the house, Health Minister Rajesh Tope said.
News English Title: Story Maharashtra Health minister Rajesh Tope said quarantined people will be stamp their hands election ink News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH