18 April 2025 9:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 19 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

कोरोना आपत्ती : महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने...

Corona Crisis, Maharashtra Lock Down

मुंबई, २२ मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता ७४वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा ३२४ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील काही तासांत कोरोनाचे १० नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील ६ रुग्ण मुंबईतील असून इतर ४ रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती असतानाच करोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पंजाब सरकारने पाच जिल्हे तर राजस्थान सरकारने संपूर्ण राज्यच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही राज्यातील सरकारने रविवारी, जनता कर्फ्यूच्या दिवशीच राज्य पुढील काही दिवस लॉकडाऊन राहतील अशी घोषणा केली आहे. त्यामुळे औषधांची दुकानं, किराना दुकानं, मीडिया आणि वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही गोष्टी सुरू राहणार नाहीत.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी जनता कर्फ्यूवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकांना प्रेमानं आवाहन करून चालणार नाही. कठोर निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी चीनच्या हुकूमशाहीचा आदर्श ठेवावा लागेल. हा बंद नाही. राजकीय पक्ष करतात तसा बंद नाही. हे नागरिकांनी स्वत:हून स्वत:वर घातलेलं बंधन आहे. त्याचं कुणी राजकारण करू नये. त्यामुळे करोनाबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. आता खुर्ची नाही, तर राज्य वाचवण्याची गरज आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

 

News English Summery:  The number of coronas-positive patients has increased in Maharashtra, now reaching 74. It is reported that the figures have increased in a few hours. The number of patients has now risen to 324 across the country. Maharashtra has a high number of corona patients. In the past few hours, 10 new Corona patients have appeared. Six of these patients are from Mumbai while the other four are from Pune. While this is the situation in Maharashtra, the Punjab government has decided to lockdown the five districts while the Rajasthan government has shut down the entire state. The government of both the states has announced that the state will remain locked-in for the next few days on Sunday, the day of the Janata Curfew. Therefore, nothing will continue except essential services such as drugstores, grocery stores, media and medical treatment.

 

News English Title:  Story Maharashtra State Corona Crisis going critical towards Maharashtra Lock down.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या