आदित्य ठाकरेंकडून माहुलवासीयांसाठी गोराई येथील घरांच्या चाव्यांचे वितरण
मुंबई: तेल आणि रासायनिक कंपन्यांचा शेजार लाभलेल्या माहुलवासीयांचे जगणे अस्वच्छता, गैरसोयी आणि मुख्य म्हणजे प्रदूषित हवेमुळे असह्य़ बनले आहे. एकमेकांना खेटून असलेल्या येथील इमारतींत दिवसाही सूर्यप्रकाशाला थारा नसतो. त्यामुळे श्वसनाच्या आणि त्वचेच्या विकारांनी हे रहिवाशी ग्रासले आहेत. आयआयटी, केईएम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींनी केलेल्या विविध पाहणीत वारंवार माहुलमधील प्रदूषणावर बोट ठेवण्यात आले होते. आजही माहुलवासीयांचा प्रश्न न्यायालयाच्या दरबारात अधूनमधून उठत असतो; परंतु पालिका, युती सरकार अशा सर्वच यंत्रणा त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाय योजण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्यातच दंग होते.
मुंबईत विविध विकास प्रकल्पांमध्ये घर गमावणाऱ्या कुटुंबांसाठी ‘एमएमआरडीए’ने माहुल गावात ७२ इमारती बांधल्या आहेत. सध्या येथील संकु लांमध्ये सुमारे ६ हजार प्रकल्पबाधित कुटुंबे वास्तव्यास आहेत. यामध्ये विद्याविहार येथील १,२००, तानसा पाइपलाइन सायकल ट्रॅक प्रकल्पातील १०००, वांद्रे येथील ४५० आणि उर्वरित कु टुंबे घाटकोपर, कुर्ला, पवई या भागांतील आहेत. मात्र इथल्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेले इथले रहिवासी पुन्हा एकदा विस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. आम्हाला या नरकात राहायचे नाही, आम्हाला इतरत्र घरे द्या, अशी या रहिवाशांची मागणी आहे.
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून जीवघेण्या प्रदूषणात राहणाऱ्या २०० हून अधिक माहुलवासीयांची अखेर मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली आहे. माहुलवासीयांसाठी गोराई येथे बांधण्यात आलेल्या घरांचे ताबापत्र व चाव्यांचे वितरण काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मातोश्री’ निवासस्थानी हे चावीवाटप पार पडले.
This afternoon I handed over the first 10 keys to people being shifted out of Mahul, as I had promised earlier, on humanitarian grounds to MHADA homes. 200 people identified and eligible will be shifted in the first batch. The rest of the keys will be given tomorrow pic.twitter.com/bf9wXMRCOq
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 6, 2020
तानसा जलवाहिनीवरील झोपडपट्ट्या हटवण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. आतापर्यंत यापैकी सुमारे ५००० जणांचे माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र चेंबूर, ट्रॉम्बे परिसरातील विविध रिफायनरी प्रकल्पांमुळे हा परिसर राहण्यास धोकादायक ठरला आहे. प्रदूषणामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांना टीबी, अस्थमा या श्वसनाच्या आजारांबरोबरच त्वचा विकार, कॅन्सरसारखे जीवघेणे आजार झाल्याचे समोर आले आहे. प्रदूषणामुळेच शेकडो रहिवाशांचा मृत्य झाल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या अहवालानुसार न्यायालयाने प्रकल्पग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी घरे द्यावीत किंवा त्यांना इतर ठिकाणी राहण्यासाठी दरमहा १५ हजार रुपये घरभाडे द्यावे, असे आदेश पालिकेला दिले आहेत. मात्र पालिकेने ते आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या पाठपुराव्यातून ‘म्हाडा’तर्फे प्रकल्पग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून २०६ घरांचे वितरण करण्यात येत असून आज आदित्य यांनी १० जणांना घराच्या चाव्या सोपवल्या. उद्या उर्वरित चाव्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
News English Summery: Over the past several years, more than 200 inhabitants of the deadly pollution have finally been rescued from the shadow of death. The distribution of keys and keys of the houses built at Gorai for Mahul residents was delivered by Environment Minister Aditya Thackeray yesterday. The key was passed at ‘Matoshree’ residence. The administration of the municipality is in the process of removing the slums on the Tansa waterway. So far, about 5,000 of them have been rehabilitated in the city. However, due to various refinery projects in the area of Chembur, Trombay, the area is in danger. Due to the pollution, mahul project sufferers have been exposed to life-threatening diseases like TB, asthma, respiratory diseases as well as skin disorders and cancer. Project workers are blaming hundreds of residents for the deaths due to pollution.
Web News Title: Story Mahul Pollution affected residence got new home Key from MahaVikas Aghadi Government.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC