5 November 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

CAA मुद्दा, मुख्यमंत्र्यांच्या 'दिल्ली वारी'नंतर वर्षा निवासवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

CM Uddhav Thackeray, Ajit Pawar, Sharad Pawar, Sanjay Raut

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत. शरद पवार दुपारी चारच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत मॅरेथॉन बैठका घेतल्यानंतर, आज शरद पवारांसोबत बैठक होत आहे.

CAA ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावर या बैठकीत चर्चा होते आहे अशी चर्चा आहे. तसंच अधिवेशनात काय काय करायचं याबाबतही चर्चा सुरु आहे असंही समजतं आहे. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर CAA हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे घेण्याचा नाही या कायद्याला घाबरण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. हा विषय या बैठकीत चर्चिला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA आणि NPR बद्दल गैरसमज पसरविला जात असल्याचे म्हटले आहे. यात घाबरण्यासारखे काहीही नाही असेही ते म्हणाले. आसामनंतर इतर कुठल्याही राज्यांमध्ये NRC राबवली जाणार नाही, असे पंतप्रधानांनी सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली. उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना हा विषय समजावून सांगावा लागेल. हे एवढे साधे सोपं नाही असेही ते म्हणाले. यावरुन काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने आली आहे.

 

Web Title: Story Meeting at Varsha Bungalow between Chief Minister Uddhav Thackeray Ajit Pawar and Sharad Pawar.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x