6 November 2024 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

हा डोक्यावर पडला का?; शरद पोंक्षेंवर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका

Sharad Pawar, Minister Jitendra Awhad

मुंबई: दोन दिवसांपूर्वी ‘मी सावरकर’ या कार्यक्रमासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळली होती. अभिनेते शरद पोंक्षे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांनी पोंक्षे यांचा निषेध केला होता. ‘देश गोडसेवादी की गांधीवादी’, ‘गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध’, असे फलक घेऊन विद्यार्थी आपला निषेध नोंदवत होते. त्यावेळी स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्या सर्वांना नंतर ताब्यात घेतले होते.

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकार वाट का पाहत आहे, असा थेट सवाल यावेळी पोंक्षे यांनी केला होता. सावरकरांना भारतरत्न दिल्यास तो भारतरत्नाचाच सन्मान ठरेल, असे नमूद करताना सावरकरांना भारतरत्न म्हणायला सुरुवात करा, असे आवाहन पोंक्षे यांनी केले यावेळी केले होते.

भारतातील अस्पृश्यता निवारणाविषयी केलेल्या विधानावरून अभिनेते शरद पोंक्षे यांच्या टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यापाठोपाठ राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षे यांच्या निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी एक ट्विट केलं असून, ‘हा डोक्यावर पडला काय?,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

तत्पूर्वी पोंक्षे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील जोरदार शब्दात टीका केली होती. थेट पोंक्षे यांचं नाव घेत त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो.

 

News English Summery: Actor Sharad Ponkshe’s comments on India’s un touch-ability redress have come under criticism. Housing minister Jitendra Awhad has targeted Ponkshe after Congress spokesperson Sachin Sawant and NCP leader Amol Mitkari. Awhad has tweeted a tweet saying, “Has it fallen to the head?” Actor Sharad Ponkshe’s opinion on redressal of untouchability in the country has sparked controversy. Actor Sharad Ponkshe was speaking at the award ceremony of the ‘I Savarkar’ lecture competition at Ferguson College in Pune.

 

Web News Title: Story Minister Jitendra Awhad angry on actor Sharad Ponkshe statement.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x