23 February 2025 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

सर्व मोदी भक्तांनी सुद्धा सोशल मीडिया सोडावा म्हणजे देश शांत होईल - नवाब मलिक

PM Narendra Modi, Minister Nawab Malik, Modi Bhakt

नवी दिल्ली: भाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन असं म्हटलं आहे.

मात्र यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटर नाही तर द्वेष सोडा असं म्हणत मोदींची खिल्ली उडवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मोदींसह सर्व मोदी भक्तांना देखील समाज माध्यमांवरून बाहेर जा असं आवाहन करत त्यामुळे देश शांत होईल असा खोचक टोला लगावला आहे.

देशातील एखादी मोठी कंपनी स्वदेशी सोशल मीडिया आणणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ट्विटनंतर ही शक्यता वर्तवली जात आहे. नरेंद्र मोदींनी नेहमी मेक इन इंडियाला प्रोत्साहन दिलं आहे. अशात रविवारी भारत स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करु शकतो असं बोललं जातं आहे. त्यामुळे गुगलला टक्कर देण्यासाठी भारताचा गुटरगू नावाचा प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात येईल असं व्हायरल होत आहे. सरकारकडे संपूर्ण देशाचा डेटा असल्याने यामध्ये सरकारच एखादं सुरक्षेचं कारण देऊन यामध्ये पुढाकार घेणार असं देखील म्हटलं जातं.

सोशल मीडियामध्ये मोठी उत्सुकता
जर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेऊन येणार असतील तर त्यांचे फॉलोवर्स तिकडे शिफ्ट होतील का? जगभरातील जे नेते मोदींशी कनेक्टेड आहेत ते देखील नव्या प्लॉटफॉर्मवर शिफ्ट होतील का? या सर्व चर्चांना रविवारीच पूर्णविराम मिळणार आहे.

 

News English Summery: Prime Minister Narendra Modi, who ordered BJP workers to be active on social media, is planning to stay away from social media. Through Twitter, Modi has hinted at social media to be rambunctious. Modi has tweeted a tweet about this. In this tweet, he wrote that he was planning to release Facebook, Twitter, Instagram and YouTube on Sunday. It is said that it will clarify its role soon. But different reactions are emanating from this. Congress leader Rahul Gandhi ridiculed Modi, saying that he should not hate Twitter but Twitter. On the other hand, NCP leader and Minister Nawab Malik has appealed to all Modi devotees, including Modi, to go out on social media so that the country will be quiet.

 

Web News Title: Story Minister Nawab Malik criticized PM Narendra Modi and Modi followers over social media exit.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x