22 February 2025 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

हसत हसत म्हणाले, सगळ्यांनी मास्क घातलाय, म्हणून मी मास्क घातलेला नाही

Raj Thackeray, Corona face Mask

मुंबई, ७ मे : राज्यात कोरोनाचे बुधवारी सर्वाधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत राज्यभरात १,२३३ रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६,७५८ वर पोहोचली. राज्यात बुधवारी कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील २५ जणांचा समावेश आहे. राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ६५१ वर पोहोचली आहे. राज्यातील परिस्थितीवर केंद्रानंही चिंता व्यक्त केली असून, करोनाचा प्रसार थोपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लवकरच बैठक आयोजित केली आहे.

तत्पूर्वी राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मंत्रालयात ही बैठक [पार पडली, त्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज ठाकरे उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सगळे नेते मंत्रालयात पोहोचले होते. त्यावेळी राज ठाकरे वगळता सर्वच जणांनी मास्क घातले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मास्क घालणं बंधनकारक आहे. मास्क न घातल्यास १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर उलटसुलट चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान या बैठकीत आपण मांडलेल्या मुद्द्यांची माहिती राज ठाकरेंनी पत्रकारांना दिली. त्यावेळी तुम्ही फेस मास्क का लावला नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सगळ्यांनी मास्क घातलाय, म्हणून मी मास्क घातलेला नाही, असं उत्तर राज यांनी हसत हसत दिलं.

परिस्थिती बिकट होतं चालल्याने राज्य सरकारची देखील डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळते. त्यात जर विरोधकांनी टीकेची धार वाढविल्यास सरकारसमोर मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या रूपाने मोठं आवाहन उभं राहणार असल्याने सरकारने विरोधकांना विश्वासात घेण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं आहे.

 

News English Summary: Meanwhile, Raj Thackeray informed the journalists about the issues raised by him in this meeting. They were asked why you didn’t wear a face mask at that time. Everyone is wearing a mask on it, so I am not wearing a mask, replied Uttar Raj with a smile.

News English Title: Story MNS Chief Raj Thackeray answers question about not wearing face mask News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x