23 December 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर
x

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

Veer Savarkar, MNS Chief Raj Thackeray

मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “क्रांतिकारकांचे सेनापती, हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करणारे तत्वज्ञ, विज्ञानिष्ठ, ज्वलंत साहित्यिक, क्रियाशील समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आदरांजली वाहिली. भाजप नेते आशिष शेलार यांच्या विनंतीनंतर विधीमंडळात ठेवलेल्या सावरकरांच्या प्रतिमेवर थोरातांनी पुष्पांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या कामकाजासाठी जाताना अजित पवार यांनी माध्यमांकडं आपली भूमिका स्पष्ट केली. ‘चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात एखादी चर्चा येणार असेल तर कुणाला आक्षेप असण्याची हरकत नाही. गेल्या ३० वर्षांत मी अनेकदा अशा चर्चांमध्ये भाग घेतला आहे. सावरकरांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही,’ असं अजित पवार म्हणाले.

 

News English Summery: Maharashtra Navnirman Sena Chairman Raj Thackeray also paid tribute to freedom fighter Savarkar via Twitter. Raj Thackeray said in a tweet, “Today’s death anniversary of the Army Chief of the Revolutionaries, philosophers, scientists, vivid literate, activist social reformers, activist social reformers, freedom fighter Vinayak Damodar Savarkar.

 

Web Title: Story MNS chief Raj Thackeray pays tribute ti Swatantraveer Savarkar.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x