22 January 2025 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

मराठी भाषा दिनी राज ठाकरेंनी पोस्ट केला काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ

Marathi Bhasha Din, Jammu Kashmir, Raj Thackeray

मुंबई: महाराष्ट्रासह जगभरात आज मराठी भाषा दिन साजरा होत असून विविध स्तरांतील मान्यवर सोशल मीडियावरून मराठी दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी दिनानिमित्त एका काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. ‘हा व्हिडिओ आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशा शुभेच्छाही राज यांनी दिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आज मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून शमिमा अख्तरच्या आवाजातील ‘रुणुझुणु’ हे गीत सोशल मिडीयावर गुंजू लागले. यास राज ठाकरे यांनीही त्यांच्या खास शैलीत दाद दिली. तसेच समस्त मराठी बांधवांना त्यांनी आठवणही करून दिली. संत ज्ञानेश्वरांच्या रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदींनी कळसास नेल्या. त्यातील एक रचना शमीम अख्तर ह्या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटणं, हा कश्मिरीयतने मराठीप्रति दाखवलेला आदर, तो वृद्धिंगत होवो, राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर त्यांनी कुसुमाग्रजांचा एक फोटो शेअर करत कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मानदंडच असं म्हणत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारी एक पोस्ट केली.

 

News English Summery: This video by Shamim Akhtar has been shared by Raj Thackeray. It is an honor for a Kashmiri youth to share this design in Marathi with the Kashmiri people. Raj wishes that he should grow old and make his kingdom aware of its glory.

 

Web Title: Story MNS chief Raj Thackeray shares a video of Jammu Kashmiri singer on the occasion of Marathi Bhasha Din.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x