22 November 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

लोकं कोरोना पेक्षा सरकारी रुग्णालयाला जास्ती घाबरत आहेत - संदीप देशपांडे

MNS Sandeep Deshpande, BMC Hospitals

मुंबई, ९ मे: राज्य शासनाचे आदेश निघाल्यानंतर जराही वेळ न घालवता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून इकबाल सिंह चहल यांनी रात्रीच मुंबई पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील करोनाचं संकट लक्षात घेऊन चहल यांनी सूत्रे स्वीकारताच रात्री उशिरा चारही अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन करोना साथीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्याचे कळते.

दुसरीकडे पालिका कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीची सक्ती करणारे परिपत्रक काढून एक आठवडा उलटत नाही तोच पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची उपस्थिती ७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय घेतल्यानंतर काही तासातच पालिका आयुक्तांची बदली झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

दरम्यान, सायन रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पालिकेकडून सायन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. रमेश भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे सध्या सायनमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रमेश भारमल हे आता २४ तास रुग्णालयातच राहणार असल्याचे समजते.

त्यात विरोधकांनी देखील मुंबई महापालिकेच्या इस्पितळातील दर्जा आणि सुविधांवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील मुंबई पालिकेतील व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ वरून एक ट्विट करत म्हटलं आहे, “लोक करोना पेक्षा सरकारी रुग्णालयाला जास्ती घाबरत आहेत हे चित्र नक्कीच चांगलं नाही. त्यांच्या मनात सरकारी रुग्णालया बद्दल विश्वास निर्माण करायला हवा.’

 

News English Summary: Opponents have also raised a number of questions about the quality and facilities at the Mumbai Municipal Hospital. MNS general secretary Sandeep Deshpande also tweeted from a viral video in Mumbai Municipal Corporation, saying, “People are more afraid of government hospitals than Corona. The picture is definitely better. They need to have faith in government hospitals.”

News English Title: Story MNS leader Sandeep Deshpande criticized Mumbai BMC hospitals News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x