22 January 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

मुंबईची भाषा? कानाखाली काढलेले मराठी सुविचार ह्यांना बरोबर वाचता येतील: शालिनी ठाकरे

MNS Leader Shalini Thackeray, SAB TV, Marahi language, Hindi Language

मुंबई: सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त होताना दिसत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सब टीव्ही वहिनीला सज्जड दम भरला आहे. यावर त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली ‘सुविचार’ लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत!. ‘कानाखाली काढलेले मराठी सुविचार’ ह्यांना बरोबर वाचता येतील, असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे.

तसेच मनसे कार्यकर्त्यांनी यावर “तारक मेहताचा उलटा चष्मा” सरळ करावा लागेल म्हणजे त्यांना मुंबईची भाषा कोणती ते स्पष्ट दिसेल असं म्हटलं आहे. यावर सब टीव्ही वाहिनीकडून अजून प्रतिक्रिया आली नसली तरी मनसे यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summery: Maharashtra Navnirman Sena has expressed its anger over Mumbai’s ‘common language’ in a dialogue in the series ‘Tarak Mehta Ka Ulta Chasma’ on the sub TV channel. Many MNS leaders are expressing anger over this.

 

Web News Title: Story MNS Leader Shalini Thackeray angry over SONY SAB TV saying Mumbais Language is Hindi.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x