आ. राजू पाटील यांचा दिशा कायदा पाठपुरावा; भाजपकडून विधानसभेत मुद्दा हायजॅक?
मुंबई: महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्रप्रदेश सरकारने आणलेल्या दिशा कायद्याची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबंधिची माहिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर देखील जाऊ आले आहेत.
गृहमंत्र्यांच्या हैद्राबाद दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल हे देखील उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. हिंगणघाट तरुणीला जिवंत जाळून हत्या प्रकरणानंतर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुध्दा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी आज विजयवाडा येथे आलो आहे. मी आणि माझ्यासमवेतच्या शिष्टमंडळाने आंध्रप्रदेशच्या गृहमंत्री श्रीमती मेकाथोटी सुचारिथा यांची भेट घेतली.#दिशा कायद्याचे स्वरूप, प्रक्रिया आदींची माहिती घेतली pic.twitter.com/Q9bEzIHaes
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 20, 2020
सध्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं असून आजचा तिसरा दिवस आहे. आज विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्दा सभागृहात उपस्थित करून राज्य सरकारला या कायद्याच्या अमलबजावणीवरून प्रश्न देखील विचारले. विशेष म्हणजे यापूर्वी भाजपने कधीच या मुद्यावरून सरकारला विचारणा किंवा पाठपुरावा केला नव्हता. मात्र मनसेचे आमदार राजू पाटील यांनी डिसेंबर २०१९ पासून याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वारंवार पत्रं व्यवहार केला होता. त्यानंतर दुर्दैवाने हिंगणघाट सारखी दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आणि सरकार पेचात सापडताच राज्य सरकारने आंध्र प्रदेशचा दौरा करत दिशा कायदयाच्या बाबतीत हालचाली सुरु केल्या. मात्र मनसेने ताणलेला विषय आयता स्वतःकडे घेण्याची भाजपची रणनीती असल्याचं सध्या चित्र आहे.
तत्पूर्वी, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे बलात्कार आणि महिला अत्याचारासंबंधित “दिशा कायदा” महाराष्ट्रात देखील अमलात आणावा यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन विनंती केली होती. आमदार राजू पाटील यांचं १७ डिसेंबर २०१९ मधील ते पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं तसेच त्याचा पाठपुरावा देखील केला होता.
काय होतं ते मुख्यमंत्र्यांना दिलेलं नेमकं पत्रं
आंध्र प्रदेश विधानसभेने #AndhraPradeshDishaAct पारित केलं. बलात्काराची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे केली जाणार आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आता तरी महाराष्ट्रात तत्सम कायदा होईल का ? @CMOMaharashtra pic.twitter.com/kmpyit4bqv
— Raju Patil (@rajupatilmanase) February 10, 2020
News English Summery: Earlier, MNS MLA Raju Patil had written a letter to the Chief Minister demanding implementation of the “Directions Act” on rape and women oppression in Maharashtra as per the Andhra Pradesh government. The letter of MLA Raju Patil was written on 17th December 2019 to the Chief Minister on December 9 and it was followed.
Web Title: Story MNS MLA Raju Patil follow up over Disha Law is hijack by BJP Leader Pravind Darekar.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो