14 January 2025 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

दणका! आणि पैसे बुडवणाऱ्या बिल्डरने जगताप दांपत्याचे ९ लाख ५० हजार परत केले

MNS Tulsi Joshi Palghar, Marathi Manus, Raj Thackeray, Amit Thackeray

नवी मुंबई, २० मार्च: राज ठाकरेंच्या अन्याय तेथे लाथ मारण्याच्या आदेशाचं महाराष्ट्र सैनिकांनी पालन केल्याचं पाहायला मिळालं आहे. नवी मुंबई शहरातील कामोठे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रविण जगताप आणि स्मिता जगताप यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. प्रविण जगताप हे सिवील अभियंता म्हणून स्वतःचा छोटासा व्यवसाय करतात. त्यामुळे व्यवहारात थोडा जरी आर्थिक फटका बसला तर थेट व्यवसाय बंद करावा लागेल अशी स्थिती कायम होती.

मागील ६ महिने केलेल्या कामाचे ९,५०,००० लाख एका कंपनीने न देण्याचा चंग बांधला होता आणि अनेकदा पाठपुरावा करून देखील संबंधित कंपनीने पैसे परत न केल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं होतं आणि संबंधित कंपनी मोठी असल्याने ते त्यांविरुद्ध काहीच करू शकत नसल्याने हतबल होऊन अखेर एका मित्रामार्फत ते पालघरचे महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांना जाऊन भेटले आणि मदत करण्याची विनंती केली. कारण मागील वर्षभरापासून अडकलेले पैसे कसे परत मिळवावे यांचं कोड्यात ते अडकले होते.

शनिवार दि. १४ मार्च २०२० रोजी हे जगताप दांपत्य तुलसी जोशींना भेटले आणि त्यांनी त्वरीत संबंधित बिल्डरकडे जाऊन मला तिकडून फोन करा असे त्यांना सांगितले. त्यानंतर तुलसी जोशी यांनी त्यांना मनसे भाषेत सज्जड दम भरला आणि महाराष्ट्र सैनिकांना प्रत्यक्षात तूम्हाला भेटण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा देखील दिला. त्यानंतर बिल्डरने सर्व थकलेली रक्कम म्हणजे ९ लाख ५० हजार ऑनलाईन ट्रान्सफर केली आणि जगताप दांपत्यास मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे जगताप दांपत्य अतिशय खूष झालं आणि दोघांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांचे मनपूर्वक आभार मानले.

 

News English Summery:  Maharashtra Thackeray has been found to have obeyed the orders to kick Raj Thackeray’s injustice there. Praveen Jagtap and Smita Jagtap, who reside at Kamothe in Navi Mumbai city, have received such great comfort. Praveen Jagtap runs his own small business as a civil engineer. Thus, even if there was a slight financial setback in the transaction, it was always a case of shutting down the business directly. One company was committed to not pay 950,000 lakh of work done in the last 6 months, and many times the pursuit also caused financial crisis on them due to non-refunding of the company and since they could not do anything against them as the company was large, they were finally defeated by a friend. Maharashtra soldier went to meet Tulsi Joshi and requested help. Because they were stuck in a code of how to get the money back from the previous year.

 

News English Title:  Story MNS Palghar Tulsi Joshi fight for getting money back from fraud builder to Marathi family News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x