मुंबई पालिकेच्या GS वॉर्डमधून आजपर्यंत ३०५ जण ठणठणीत बरे झाले

मुंबई ४ मे: मुंबईतील महापालिकेच्या GS वॉर्डमधील निरनिराळ्या इस्पितळातून आजपर्यंत एकूण ३०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान मुंबईत कोरोनाचे ५१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाग्रस्ताची संख्या ९ हजार १२३ इतकी झाली आहे. कोरोनाची लागण होऊन आत्तापर्यंत एकट्या मुंबईत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
“Tough times don’t define you. They refine you.” @mybmcWardGS , happy to announce that, 305 Covid Positive persons from @mybmcwardGS have been recovered and discharged from various hospitals till today. @CMOMaharashtra
#TogetherWeWillWin #BlessedToServed @mybmc pic.twitter.com/jy8VzEGgUE— WARD GS BMC (@mybmcWardGS) May 4, 2020
दरम्यान, राज्यात ६७८ नविन रूग्ण वाढले असून २७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या १२,२९६ वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५२१ वर पोहोचली आहे. राज्यात आज एकूण कोरोना बाधित १२१ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५२१ आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, तर वसई विरार मधील १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमधील एका जणाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.
एकूणच देशात कोरोनाचा प्रसार वाढत असताना सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे. यावर कठोर निर्णय घेत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा असे आदेश मुख्यमंत्र्याकडून देण्यात आले आहेत. राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे अशा सूचना सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अर्थचक्रही सुरू राहिलं पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असं नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये कसं येतील ते पाहावं असं मुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांना बजावण्यात आलं आहे.
News English Summary: To date, a total of 305 coronary artery disease patients have returned home from various hospitals in Mumbai Municipal Corporation’s GS ward. Meanwhile, 510 new corona patients have been found in Mumbai. Coronary infections have killed 18 people. With the discovery of new patients, the number of coronary heart disease patients in Mumbai has risen to 9,123.
News English Title: Story Mumbai BMC GS ward total 305 covid 19 positive recovered and discharged till date News latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB