मुख्यमंत्री उद्धवजी असल्याने भाजपाला मुंबईत दंगल घडवणं शक्य झालं नाही: आव्हाड
मुंबई: दिल्ली आणि मुंबईत राडा झाला म्हणजे देश संपला. दिल्लीत ज्याप्रमाणे दंगली घडल्या त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती, मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याने भाजपला हे शक्य झालं नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.
या देशाचं राजकरण धर्मद्वेषाच्या माध्यमातून आपल्या ताब्यात ठेवायचं काम भाजप करू पाहतेय, हे दिल्लीच्या दंगलीवरून स्पष्ट होत आहे. दिल्लीच्या दंगलीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी एकही शब्द न काढणे, म्हणजेचं क्रूरतेची परिसीमा आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी हेच ‘दिल्ली पॅटर्न’ देशभरात चालवणार असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तत्पूर्वी अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘ये दिवार तुटती क्यू नही…’ असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे. ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है” अशा शब्दात महाविकासआघाडीवर टीका करणाऱ्या व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० पर्यंत तर आमदारांची संख्या १० पर्यंत जायला हवी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असली पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिवसीय कार्यकर्ता शिबीराचं आयोजन केलं आहे. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरू केली आहे, असे सांगतानाच या सरकारने सत्तेवर येताच मागच्या सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय बदलले आहेत. कदाचित भाजपला हे निर्णय योग्यही वाटत असतील. पण ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत असं देखील अजित पवार म्हणाले.
News English Summery: Radha took place in Delhi and Mumbai, and the country ended. BJP had a mindset of riots in Mumbai just as riots took place in Delhi, but NCP leader and Home Minister Jitendra Awhad has alleged that BJP could not do so because Chief Minister Uddhav Thackeray in Maharashtra. He was speaking at a rally organized by NCP’s Mumbai divisional activists. Delhi riots are making it clear that the BJP is trying to keep the country under its control through hatred. Home Minister Amit Shah did not utter a word about the Delhi riots, which means brutality. Jitendra Awhad has also alleged that Prime Minister Narendra Modi and Amit Shah will run the ‘Delhi pattern’ across the country.
Web News Title: Story NCP Leader and minister Jitendra Swhad criticized BJP.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय