16 April 2025 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

भीमा-कोरेगाव: संभाजी भिडे आणि एकबोटेंनी वेगळं वातावरण तयार केलं: शरद पवार

Sharad Pawar, Elgar Parishad, Koregaon Bhima, Sambhaji Bhide

मुंबई: भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. भीमा कोरेगाव आण एल्गार परिषद हे दोन वेगळे कार्यक्रम आहे. यामध्ये उलटसुलट चर्चा होत असल्याचं शरद पवार म्हणाले.

‘भीमा कोरेगाव हा एक वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षांपासून या कार्यक्रमासाठी लोक कोरेगावात येतात. विजय स्तंभाला अभिवादन करतात. भीमा कोरेगावला येणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. पण यामध्ये संभाजी भिडे आणि अनिक एकबोटेंकडून वेगळं वातावरण तयार करण्यात आलं. त्यावेळी नक्की काय झालं हे बाहेर येईन’ असं शरद पावर म्हणाले.

दरवर्षी लोक जमतात आणि विजय स्तंभाला अभिवादन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आल्यानंतर तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढली. संभाजी भिडे यांनी त्या ठिकाणी एक वेगळे वातावरण निर्माण केलं गेलं. त्यात नक्की काय झालं ते चौकशीत बाहेर येईल, असं शरद पवार म्हणाले.

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा घटनांसंदर्भात शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,”एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा यांचा संबंध नाही. त्यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. एल्गार परिषदेत काही भाषणं केली गेली. १०० पेक्षा अधिक संघटनांचा सहभाग होता. अध्यक्षपद पी.बी सावंतांकडे होतं. पण ते न आल्यानं प्रकाश आंबेडकरांनी अध्यक्षपद भूषवलं. अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, हजर नसलेल्या लोकांवर पोलिसांनी खटले भरले आणि आणि त्यांना तुरूंगात टाकलं,” असं आरोप पवार यांनी केला.

 

Web Title: Story NCP President Sharad Pawar press conference about Bhima Koregaon Elgar Parishad Sambhaji Bhide and retired justice B G Kolse Patil.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या