22 December 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
x

१९७८ मध्ये मी किती पक्षांचं सरकार चालवलं हे मलाच आठवत नाही: शरद पवार

NCP President Sharad Pawar

मुंबई: ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे टीकणार आहे त्यात काहीही अडचण येणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाच्या व्हिजन २०२० या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे विचार मांडले आहेत.

सरकार चालवताना काही गोष्टी शिकायच्या असतात बाहेर उघड करायच्या नसतात, शिवसेना म्हणून आमचा कधीही संपर्क आला नाही, बाळासाहेबांशी मित्र म्हणून संबंध आला, बाळासाहेबांमध्ये एक सभ्यता होती, आम्ही दोघे जाहीर सभेतून एकमेकांबद्दल बोलायचो मात्र जाहीर सभानंतर आम्ही एकत्र आलो की सुसंवाद चालायचा. बाळासाहेबांनी भाषणात बोलले शब्द कधीही मागे घेतले नाहीत, बाळासाहेबांचा निर्णय ठाम असायचा असं शरद पवारांनी बाळासाहेबांबद्दल बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी वरील मत व्यक्त केले. सरकारचं नेतृत्व करणा-या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असते, त्यांची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे असे पवारांनी म्हटले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, की हे तीन पक्षांचे सरकार आहे. १९७८ मध्ये मी किती पक्षांचं सरकार चालवलं हे मला आठवत नाही. शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने कारभार करत आहेत, त्याला किती मार्क द्याल? असे विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, मार्क देण्यासाठी परीक्षेची वेळ अजून आलेली नाही, पण त्यांचा मार्ग योग्य आहे. इतरांना काम करण्यासाठी संधी देत आहेत. प्रोत्साहनही देत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

 

Web Title: Story NCP President Sharad Pawar said I do not remember about alliance parties which I was handled in 1978.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x