20 April 2025 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

राष्ट्रवादीपुढे भाजपनीती फिकी? उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेवरील मार्ग मोकळा होणार?

Corona Crisis, Covid 19, CM Uddhav Thackeray

मुंबई, २७ एप्रिल : राज्यावर कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. या संकटाशी तोंड देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री जाईल की राहील अशी राजकीय चर्चा रंगली आहे. राज्यपालांनी जर याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाहीतर महाविकास आघाडी सरकार नवीन पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

यापूर्वी ९ एप्रिलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबाबत ठराव मंजूर झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्रीपद हे वैधानिक पद नसल्याचे कारण पुढे करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा ठराव ग्राह्य धरण्यास नकार दिला होता.

राज्य मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्र्यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना संदर्भात आढावा तसंच संचारबंदीबाबत पुढे काय करणार यावर चर्चा होणार आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी मंत्रिमंडळ पुन्हा शिफारस प्रस्ताव आणावा का संदर्भात चर्चा अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने कोरोना आपत्तीत उद्धव ठाकरेंना गोत्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय, संविधानिक तसेच प्रशासकीय अनुभवापुढे भाजपची हवा गुल होतं आहे अशी चर्चा आहे.

मंत्रिमंडळाची बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली घ्यायची, हे ठरवण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्‍या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत मंजूर केल्या जाणार्‍या प्रस्तावाला आक्षेप घेता येणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीसाठी कॅबिनेट नोट आणून प्रस्ताव द्या, असा पर्याय सुचवला आहे. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीचा मार्ग मोकळा होईल.

 

News English Summary: The Chief Minister has the power to decide under whose chairmanship the Cabinet meeting should be held. Therefore, in the meeting to be held under the chairmanship of Ajit Pawar, the proposal to be approved regarding Uddhav Thackeray cannot be objected to. Governor Bhagat Singh Koshyari has also suggested bringing a cabinet note for the appointment of Uddhav Thackeray. As a result, the way will be clear for the appointment of Uddhav Thackeray to the Legislative Council.

News English Title: Story New plan of Mahavikas Aghadi for CM Uddhav Thackerays at Mumbai News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या