18 November 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN
x

संचारबंदी लागू आहे; टेहळणी करायला विनाकारण बाहेर पडू नका - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, Corona Crisis

मुंबई, २४ मार्च: राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. कोरोना व्हायरस या संकटाचं गांभीर्य ओळखून लोकांनी सहकार्य करावं, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे’, असा धीर देत नागरीकांनी घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अन्नधान्याचा साठा पुरेसा; काळजीचे कारण नाही.

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. टेहळणी करायला विनाकारण बाहेर पडू नका. अधिक जगण्यासाठी आपल्याला जीवनशैली थोड्या प्रमाणात काही दिवस बदलायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले.

रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा गणेश मंडळाने रक्तदान शिबिर सुरु केले. सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबवण्याची गरज आहे,असेही त्यांनी सांगितले. घरी राहून प्रत्येकजण सरकारला मोठी मदत करु शकतो. हीच तुमची मदत अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचही त्यांनी यावेळी कौतुक केले आहे.

दरम्यान, पोलिसांनाही मी सांगतोय की, आपण आपलं जगणं थांबवलेलं नाही तर जगण्याची शैली थोडासी बदलली आहे. त्यामुळे लोकांना सहकार्य करा. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांना आयटी क्षेत्र किंवा बँकिंग क्षेत्र असेल जर वाहतुकीसाठी कोणाला अडचण येत असेल तर त्यांनी पोलिसांना १०० नंबरवर संपर्क करा, पोलीस पूर्णपणे आपल्याला सहकार्य करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

News English Summery:  Chief Minister Uddhav Thackeray again spoke to the people on Tuesday, noting the increasing prevalence of corona virus in the state. Chief Minister Uddhav Thackeray has urged the people to cooperate with the seriousness of the corona virus. Uddhav Thackeray also appealed to the citizens to stay in the house and stay safe, assuring that the crisis is serious but the government is firm. Adequate food reserves; No worries. To prevent Corona, a communication block has been implemented in the state. Do not go out for a walk. Chief Minister Uddhav Thackeray once again appealed to the people to change their lifestyle in order to live more.

 

News English Title:  Story no one should use this crisis as an opportunity says CM Uddhav Thackeray News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x