23 December 2024 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात
x

सत्ताधाऱ्यांमध्ये आपसांतच सुसंवाद नाही, मग आम्हाला सुसंवादासाठी का बोलावलं: फडणवीस

Opposition Leader Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray, MahaVikas Aghadi, Maharashtra Assembly Budget Session

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.

यांच्यात ‘दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत नाही अशी नव्या सरकारची अवस्था आहे. त्यांच्यातच विसंवाद आहे. सरकारनं शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. ज्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत त्यांनी अंमलात आणली. कर्जमाफीमध्ये केवळ पीककर्जाचा समावेश आहे. शेडनेट, पशुपालन अशा कर्जाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. ही फसवणूक आहे. अशा परिस्थितीत आम्ही सरकारच्या चहापानाला जाऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

त्याचसोबत राज्य सरकारकडून मागील काळातील निर्णय रद्द केले जात आहे त्यावरुनही विरोधी पक्षाने टीका केली. सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार वाढला आहे. जलयुक्त शिवार सरकार बंद जरूर करेल, पण जनता ती बंद होऊ देणार नाही. जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप विरोधकांनी केला.

 

 

News English Summery: A press conference of BJP workers was organized in Mumbai today. Former Chief Minister Devendra Fadnavis praised Chief Minister Uddhav Thackeray for two things. The Chief Minister has handed over the Elgar Council inquiry to the NIA and secondly he had announced his support for the CAA. The former Chief Minister praised the present Chief Minister, saying ‘Congratulations to Chief Minister Uddhav Thackeray’.

 

Web Title: Story Opposition leader Devendra Fadnavis slam before Thackeray government budget session.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x