24 November 2024 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

फडणवीसांनी केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया सरकार जाईपर्यंत सुरू होती: अजित पवार

Finance Minister Ajit Pawar, Maharashtra State Budget 2020, Farmers Loan Waiver

मुंबई: शेरोशायरी, कविता म्हणत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पहिल्याच अर्थसंकल्पात अजित पवार यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडला. शेतकरी, बेरोजगार, उद्योग, शहरी-ग्रामीण, पर्यटन, वैद्यकीय आदी क्षेत्रांसह समाजातील सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन दिसतो. अजित पवार यांनी केलेल्या काही घोषणा या जुन्याच होत्या. त्या घोषणांचा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा उल्लेख करण्यात आला. एकंदर या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्यादा 7 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात तरतूद करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिक, बेरोजगार तरुण यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कर्जमाफीच्या मुद्दावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर चोख प्रत्युत्तर दिले. आधीच्या फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफी केली. मात्र त्यात अनेक त्रुटी होत्या. तब्बल २६ वेळा कर्जमाफीच्या आदेशात बदल करण्यात आले. त्यामुळे शेतकरी गोंधळून गेले होते. दररोज नवनवीन आदेश येत होते. तसेच भाजपने केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया दीड वर्षे नव्हे तर सरकार जाईपर्यंत सुरू होती, असा टोला अजित पवार यांनी लागवला.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया आम्ही तीन महिन्यात संपविणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ दोनच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे दोन महिन्यात शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

News English Summery: Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar presented the first budget of the Thackeray government, saying Sheroshairi, Kavita. In the first budget, Ajit Pawar rained down various announcements. The budget presented by Finance Minister Ajit Pawar shows that efforts to appease all the sections of the society including farmers, unemployed, industries, urban-rural, tourism and medical sectors. Some of the announcements made by Ajit Pawar were old. Those announcements were mentioned again in today’s budget speech. Overall, the budget has tried to give something to everyone in the state, Ajit Pawar said. Finance Minister Ajit Pawar presented the budget to the Assembly. Finance Minister Ajit Pawar has presented the budget in the assembly. In this regard, provision will be made to provide loan waiver of more than Rs. 7000 to the farmers. Also, the construction workers, unemployed youths will get great relief.

 

Web News Title: Story previous debt waiver process lasted year and half we will finish 2 months says Finance Minister Ajit Pawar.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x