15 January 2025 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

आदित्य ठाकरेंच्या दर्जेदार 'पब्लिक स्कुल' संकल्पनेला पालकांचा चांगला प्रतिसाद

Aaditya Thackeray, Public School

मुंबई: बीएमसी शाळा आता मुंबई पब्लिक स्कूल म्हणून ओळखल्या जातील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मुंबई पब्लिक स्कूलच्या लोगोचे अनावरण केलं होतं. बीएमसी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना बीएमसी शाळांकडे खेचण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली आहेत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या या व्हिजनमध्ये उद्धव ठाकरे यांची त्यांना खूप साथ लाभत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई पब्लिक स्कूलसह २२३ माध्यमिक शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं आहे. लहान मुलांसाठी देखील विशेष शाळा सुरू करण्यात आल्या असून या शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीएमसीच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या लोगोचे अनावरण केलं होतं. त्यावेळी त्यांनी बीएमसीच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते आणि यातून सामान्य घरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता.

त्यावेळी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते की, आधुनिक अभ्यासक्रमांच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विविध महत्त्वाच्या व्यक्तींच्या मदतीने ‘लेट्स रीड’ कार्यक्रम राबविला जाईल. बीएमसीच्या सीबीएसई आणि आयसीएसई संलग्न शाळांमध्ये मार्चच्या मध्यापासून प्रवेश सुरू होईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं. जोगेश्वरीच्या पूनम नगरमध्ये सीबीएसई बोर्डाची पहिली बीएमसी शाळा आणि माहीममधील आयसीएसईची पहिली बीएमसी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या शाळांमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांची ऍडमिशनसाठी रीघ लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील संकल्पनेवर आदित्य ठाकरे काम करत आहेत आणि त्यात सातत्य आणि गुणवत्ता राखली गेल्यास मुंबई तसेच कालांतराने राज्यात दर्जेदार शाळा उभारणं गरजेचं असल्याचं मत अनेकांनी नोंदवलं आहे.

आज आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यासारखी तरुण पिढी जर नव्या आणि आधुनिक संकल्पना सरकारी पातळीवरील शिक्षण व्यवस्थेत अमलात आणण्यात यशस्वी झाल्यास ती मोठी झेप असेल हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे प्रायोगिक स्तरावर असलेले हे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करून पुढे घेऊन जाणं भविष्यासाठी नक्कीच होकारात्मक असेल यात शंका नाही.

 

News English Summery: BMC schools will now be known as Mumbai Public Schools. In the first week of February, Chief Minister Uddhav Thackeray had unveiled the logo of Mumbai Public School in the presence of BMC Commissioner Praveen Pardeshi and Mayor Kishori Pednekar. The government has taken several steps to improve the condition of BMC schools and pull students to BMC schools, and in this vision of environment minister Aditya Thackeray, Uddhav Thackeray is seen supporting them.

 

Web News Title: Story provide better public schools is getting a thumbs up from parents As admissions to Mumbai Public School begins environment minister Aaditya Thackeray.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x