23 November 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक, सामनाच्या पहिल्या महिला संपादक

Saamana Newspaper, Rashmi Thackeray, Dainik Saamana

मुंबई : आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादकपद ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक असणार आहेत. आजपासून त्यांच्याकडे हे पद सुपूर्द करण्यात आलं आहे. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे.

सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडले जातात. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. सामनामध्ये लिहिले जाणारे अग्रलेख देशभरात चर्चेचा विषय असतात. ९० च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली.

रश्मी ठाकरे या सक्रीय राजकारणात थेट सहभागी नसल्या तरी त्या शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभागी होत आल्या आहेत. अनेकदा शिवसेनेच्या मंचावरही त्या दिसल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना लाभाचं पद म्हणून सामना संपादक पद सोडावं लागलं. आदित्य ठाकरे यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने तेही लाभाचे पद असल्याने सामानाचे संपादक पद घेऊ शकत नव्हते. तेजस ठाकरे यांचे वय लहान आहे, त्यांना अजून तितकासा अनुभव नाही. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्तीकडेच हे पद असावे असा विचार करुन रश्मी ठाकरे यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.

 

News English Summery: From today, Rashmi Thackeray, wife of Chief Minister Uddhav Thackeray, will be the editor of the daily match. After Uddhav Thackeray became Chief Minister, he was having difficulty keeping the post of editor-in-chief. So now Rashmi Thackeray will be the editor of this match. He has been entrusted with the post from today. The match is the mouthpiece of the Shiv Sena. Balasaheb Thackeray was the editor when the match started. After him, Uddhav Thackeray was the editor of the match. But now being the Chief Minister, the benefits have created problems. Therefore, Rashmi Thackeray has been given the post of editor. In today’s match, editor Rashmi Thackeray is also mentioned. So it is important to see how they look at the workings of that match.

 

Web News Title: Story Rashmi Uddhav Thackeray is new editor of Dainik saamana.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x