14 January 2025 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

चिकन-मटण खाल्ल्याने कोरोना व्हायरल होत नाही: अजित पवार

Deputy Minister Ajit Pawar, Corona Virus

मुंबई: राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन दिवसांत ५ वर पोहचली आहे. पुण्यातील दुबईहून परतलेल्या एकाच कुटुंबियांतील तिघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (आज) बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.

अजित पवार यांनी यावेळी मुंबईतील संशयित असणाऱ्यांना करोनाची लागण झाली असेल तर चिंतेची बाब आहे. कारण याचा अर्थ झपाट्याने त्याचा फैलाव होत आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे. “लोकांना माझं आवाहन आहे की घाबरुन जाऊ नका. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाहन केलं आहे तशी काळजी घ्या. लोकांशी थेट संपर्क होणार नाही याची खबरदारी घ्या. खोकला आल्यानंतर रुमाल वापरणे अशा गोष्टींची काळजी घेण्याची नितांत गरज आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

तसेच कोरोनासंदर्भात अनेक अफवा पसरल्या आहेत. पण, चिकन-मटण खाल्ल्याने कोरोना व्हायरल होत नाही, असे स्वत: अजित पवार यांनी सांगितले. तसेच, कोरोनासंदर्भात सरकारकडून एक मेसेज देण्यात आला आहे, तो जास्तीत जास्त लोकांच्या मोबाईलवर पोहोचला पाहिजे. आपण, तो मेसेज व्हायरला करावा. त्यामुळे, कोरोनासंदर्भातील अफवा दूर होतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील चिकन मार्केट असोसिएशन अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

मुंबईत करोनाचा एकही रुग्ण नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात करोनाचे ५ रुग्ण आढळले असून स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

News English Summery: The number of Corona virus infected patients has reached 5 in two days. Corona has been reported to have been in contact with three of the same family who returned from Dubai in Pune. Chief Minister Uddhav Thackeray has convened an important meeting on Wednesday (today) after the shocking figures of the coroners came up in the state. There have also been several rumors regarding Coronas. But, eating chicken and mutton does not make corona viral, “Ajit Pawar himself said. Also, a message has been issued by the government regarding the coronas, which should reach most people’s mobiles. You should do that to the message wire. Therefore, the rumors regarding coronas will be removed, Pawar said. Meanwhile, the chicken market association of the state is reported to be meeting Ajit Pawar.

 

News English Title: Story rumors are being spread eating chicken and mutton does not cause corona virus says Deputy Minister Ajit Pawar.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x