22 January 2025 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
x

ट्रम्प यांचा अहमदाबाद दौरा संपल्यावर झोपडपट्ट्या लपविणाऱ्या भिंती पाडणार काय? शिवसेना

US President Doland Trump, Gujarat Ahemadabad, Saamana Editorial, MP Sanjay Raut, CM Uddhav Thackeray, PM Narendra Modi

मुंबई: प्रे. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या देशात येत आहेत. त्यांच्या स्वागतात कोणतीही कसर राहू नये. शेवटी हा राजकीय शिष्टाचार आहे. ‘केम छो ट्रम्प’ने ते खूश होतील, पण ट्रम्प यांना दिल्लीत आधी न उतरवता थेट अहमदाबादेत उतरवून केंद्र सरकारला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे? प्रे. ट्रम्प यांचा अहमदाबाद दौरा आटोपल्यानंतर झोपडपट्ट्या लपविणाऱ्या भिंती पाडणार काय? हे प्रश्न आहेत. मागे ‘गरिबी हटाव’ या घोषणेवरून बरीच टिंगलटवाळी झाली होती. त्याच घोषणेचे रूपांतर आता ‘गरिबी छुपाव’ या योजनेत झालेले दिसते. नव्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादेतील झोपड्यांसमोर भिंती बांधल्या जात आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘मोदी हे पंधरा वर्षे गुजरात राज्याचे ‘बडा प्रधान’ व आता पाच वर्षे संपूर्ण देशाचे ‘बडा प्रधान’ असतानाही गुजरातची गरिबी आणि बकालपण लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की का यावी?,’ असा बोचरा सवाल शिवसेनेनं केला आहे.

“सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही बाबा! ‘मौका पडे तो गधे को भी बाप कहना पडता है’ ही जगाची रीत आहे. त्यामुळे अमेरिका बलाढ्यआहे व त्यांचा अध्यक्षही खुर्चीवर असेपर्यंत बलाढ्यच असतो. अशा या बलाढय़ अमेरिकेचे बलाढय़ राष्ट्राध्यक्ष हिंदुस्थान भेटीवर येत आहेत व त्याबद्दल खुद्द प्रे. ट्रम्प, त्यांच्या पत्नी उत्साहित आहेत. त्यांच्या स्वागताची हिंदुस्थानात किंवा प्रत्यक्ष दिल्लीत किती लगबग सुरू आहे ते माहीत नाही, पण मोदी-शहा यांच्या गुजरातमध्ये ट्रम्प यांचे आगमन सर्वप्रथम होत असल्याने तेथे मात्र मोठीच लगबग सुरू झाली आहे. त्या लगबगीस काही नतद्रष्टांनी आक्षेप घेतला आह़े प्रे. ट्रम्प यांना आधी गुजरातमध्येच का नेले जात आहे या प्रश्नाचे खरे उत्तर मिळणे कठीण आहे असं सामनाने म्हटलं आहे.

 

Web Title: Story Saamana Editorial over US President Donald Visit to Gujarat.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x