सामना...हा तर आमचाच पेपर आहे: अजित पवार
मुंबई, १३ मार्च: ‘ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प दिशाभूल करणार आहे. तसंच हा अर्थसंकल्प विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय करणारा आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, ‘अर्थसंकल्पात मराठवाडा आणि विदर्भाला काहीही दिले नाही. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर दिशाभूल करणारे आहे. सिंचनाबद्दल उपमुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. तसंच, हा एकांगी आणि जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे. केवळ राजकीय भाषण, राजकीय टोलेबाजी शिवाय उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हते, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आज सभागृहात अनोखा समन्वय दिसून आला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘सामना’ हा आमचाच पेपर असल्याचे म्हटले. ते शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत होते. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, विरोधी पक्षांकडून अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. मात्र, अनेक वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांनी अर्थसंकल्पाविषयी सकारात्मक बातम्या दिल्या आहेत. यासाठी अजितदादांनी विधानसभेत अर्थसंकल्पाविषयी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे दाखवली. यावेळी ‘सामना’तील बातमीचे कात्रण हातात आल्यानंतर अजितदादांनी हा तर आमचाच पेपर आहे, असे म्हटले. यानंतर सभागृहात हशा पिकला. त्यावेळी अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही ‘सामना’ वाचतच नव्हता, असा टोलाही लगावला.
यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, विरोधी पक्षांकडून अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. मात्र, अनेक वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांनी अर्थसंकल्पाविषयी सकारात्मक बातम्या दिल्या आहेत. यासाठी अजितदादांनी विधानसभेत अर्थसंकल्पाविषयी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे दाखवली. यावेळी ‘सामना’तील बातमीचे कात्रण हातात आल्यानंतर अजितदादांनी हा तर आमचाच पेपर आहे, असे म्हटले.
News English Summery: Shiv Sena and NCP, which have often taken contradictory roles on the issue of Hindutva since the establishment of the development front in the state, have shown extraordinary coordination in the House today. Deputy Chief Minister and Leader of the NCP Ajit Pawar called ‘Saamana’ as our paper. He was responding to a discussion on the budget on Friday. At this time, Ajit Pawar said that the budget was being criticized by the opposition. However, many newspapers and media have given positive news about the budget. For this, Ajit Pawar showed the news stories about the budget being published in the Legislative Assembly. At this time, Ajit Pawar said that this is our paper after the news of the match came to fruition. After that the laughter in the hall grew. At that time, Ajit Pawar also said that you did not read ‘Saamana’ to Chandrakant Patil. During the Shiv Sena-BJP alliance government in the state, the headlines of ‘match’ were always a topic of discussion. Narendra Modi and Amit Shah were often criticized in these writings. When asked about the then Chief Minister Devendra Fadnavis, he had said that I was not reading ‘Saamana Newspaper’.
News English Title: Story Saamana is our newspaper says Deputy Chief Minister Ajit Pawar.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON