22 April 2025 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

पोलिसांसाठी राखीव नाही; पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांमध्ये सरकार विरोधात खदखद...सविस्तर रिपोर्ट

Seven Hills Hospital, Reliance Foundation, CM Uddhav Thackeray

मुंबई, २८ एप्रिल: कालच कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली. तत्पूर्वी जे घडलं त्याबद्दल धक्कादायक माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी दिली होती.

घटनाक्रमानुसार माहिती अशी की, अचानक ताप येऊन लागल्यामुळे नारायण सोनावणे यांनी प्रथम खासगी आणि नंतर राजावाडी ते कस्तुरबा..मग कस्तुरबा ते नायर…मग पुन्हा नायर ते केईएम असं नेण्यात आलं. शेवटी केईएममध्ये त्यांना पोलिस सहकाऱ्यांच्या मध्यस्तीने हातपाय पडण्याची वेळ आली आणि त्यानंतर दाखल करून घेण्यात आलं. म्हणजे सकाळी ९ वाजता ताप अंगावर घेऊनच घराबाहेर पडलेले ते रात्री १० वाजे पर्यंत त्याच स्थितीत मुंबईतील इस्पितळात हेलपाटे खात होते. त्यांच्या निधनानंतर जवळच्या मित्रमंडळी आणि नातेवाहिकांनी अनेक गोष्टी कॅमेऱ्यावर न येता सांगितल्या.

त्यानंतर महाराष्ट्रनामाच्या प्रतिनिधींनी मरोळ पोलीस वसाहत आणि इतर पोलीस वसाहतींमधील पोलीस आणि पोलीस कुटुंबीयांकडून काही माहिती समजून घेतली. त्यानंतर एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांविरीधात एक छुपा उद्रेक वाढतो आहे. त्याची कारण देखील तशीच आहेत. काही महिलांनी थेट कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांचे नाव घेऊन सांगितलं की त्यांना चांगल्या इस्पितळात दाखल करून घेतलं आणि त्याचा पाठपुरावा थेट मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी घेतल्याच्या बातम्या वाचल्या. पण हेच नेते जमिनीवर आमच्याबाबतीत काय घडतंय याची काळजी घेतात का असा संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला.

मुंबई अंधेरी पूर्वेला असलेलं सेव्हन हिल्स इस्पितळ आहे. न्यायालयीन कचाट्यात असलेलं हे इस्पितळ सध्या महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेतलं आहे. एकूण ४०० बेड्स पैकी २०० बेड्सची जवाबदारी रिलायन्स फाउंडेशनने घेतली आहे. या इस्पितळाचा दौरा स्वतः आरोग्य मंत्र्यांनी केला होता. मात्र या इस्पितळात पोलिसांना आधी वय विचारलं जातं आणि त्यानंतर विचार केला जातो. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेले मुंबई पोलीस याच वयोगातील आहेत आणि अशा वयाच्या पोलिसांना ऍडमिटच करून घेत नव्हते.

याच सेव्हन हिल्स इस्पितळात किमान ५० बेड्स तरी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राखीव करावे अशी कळकळीची विनंती पोलीस कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जर बांद्र्यातील गुरुनानक इस्पितळात ते शक्य झालं आहे मग सेव्हन हिल्स बाबतीत सरकारला काय अडचण आहे असं पोलीस आणि पोलीस कुटुंबीय बोलत आहेत. काँग्रेसच्या काळात आरोग्यमंत्री राहिलेल्या सुरेश शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी देखील नेमकी तीच गोष्ट निदर्शनास आणून सरकारला पोलिसांप्रती एक विनंती केली आहे. याच इस्पितळाच्या हद्दीत अनेक पोलीस स्टेशन्स आणि पोलीस वसाहती आहे हे देखील विशेष. त्यामुळे जर पुढे अजून पोलीस दगावल्यास सरकार विरोधात उद्रेक होऊन थेट ऑन कॅमेरा प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Seven Hills Hospital is located in the dark east of Mumbai. The hospital, which is in a court dispute, is currently being taken over by the municipal corporation for corona patients. The Reliance Foundation is responsible for 200 of the 400 beds. The hospital was visited by the health minister himself. However, in this hospital, the police are first asked about their age and then they are considered. It is noteworthy that the deceased Mumbai Police are of the same age and did not admit such policemen.

News English Title: Story Sevenhills hospital Mumbai not reserved for Mumbai Police Covid 19 News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या