31 January 2025 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

शर्मिला राज ठाकरे यांच्याकडून पोलिसांना पीपीई किट वाटप; पोलिसांची सुरक्षा महत्वाची

Sharmila Raj Thackeray, PPE Kit, Savitri Pratishthan, Corona Crisis

मुंबई, १२ एप्रिल: राज्यातील करोनाचं संकट काही कमी होताना दिसत नाही. राज्यात गेल्या २४ तासांत १८७ नवे करोना रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरी आव्हान आणखी वाढले आहे.

एकीकडे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार लांबले आहेत. पगार काढणाºया यंत्रणेतील अधिकारीच कामावर नसल्याने अनेक अडचणी आहेत. मार्च पेड इनटू एप्रिलचा पगार अधिकाऱ्यांना ५० टक्के तर कर्मचाºयांना ७५ टक्केच मिळणार आहे. कोरोनाचा मुकाबला करणारे पोलीस दल, आरोग्य सेवेतील कर्मचारीही दोन टप्प्यांच्या सरकारी कचाट्यातून सुटू शकलेले नाहीत. त्यातच आता पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनची भर पडली आहे.

मात्र आर्थिक चणचण आणि त्यात जीव देखील धोक्यात टाकावा लागत असल्याने पोलिसांची देखील चिंता वाढली आहे. राज्यात लॉकडाउनच्या काळात सुरक्षा व्यवस्थेचं काम करणाऱ्या पोलिसांच्या जिवाला करोनामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचंही समोर आलं. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला आहे. शर्मिला राज ठाकरे आणि रिटा गुप्ता यांच्या सावित्री प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या भागातील पोलिसांना पीपीई किटचं वाटप करण्यात आलं.

 

News English Summary: Police have also raised concerns as the financial crisis and their lives are at stake. During the lockdown in the state, the security of police personnel working in the state has risen due to coronation. Many policemen also reported having coronary infection. MNS has taken initiative to take care of the health of the police. Sharmila Raj Thackeray and Rita Gupta, on behalf of the Savitri Pratishthan, were allotted a PPE kit to the police in the affected areas of Corona in Mumbai.

News English Title: Story Sharmila Raj Thackeray on behalf of the Savitri Pratishthan allotted a PPE kit to police during corona crisis in Mumbai Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x