23 January 2025 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

आमचे असंख्य मुस्लिम बांधव महाराजांचा जय जयकार करतात; पण मलिकांचं? व्हिडिओतून प्रश्न उपस्थित

Nawab Malik, Chhatrapati Shivaji Maharaj

मुंबई: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मनसेच्या महामोर्चावरून टीका करताना मनसेला गांधीवादाचा डोस पाजले होते. तसेच मनसेच्या भूमिकेवर देखील टीका करताना कायदा सुव्यवस्था आणि धार्मिक मुद्यावरून राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र आता तेच मंत्री नवाब मलिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंतीला शिवनेरीवर सरकारच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्यातील अनेक नेत्यांनी गडकिल्ल्यांवर हजेरी लावली होती. त्यापैकी रायगड किल्ल्यावरील एका व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक , सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी या व्हिडिओ पोस्ट करुन नवाब मलिक आणि राष्टवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

याबाबत मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विट केलं आहे की, आमचे असंख्य मुस्लीम बांधव आहेत, ज्यांच्यासमोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की, असं ओरडलं तरी ते आनंदाने जय अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? असा सवाल उपस्थित करण्यात केला आहे. तसेच अशा प्रवृत्तीच्या माणसाने राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर राहावं हे तुम्हाला पटतं का? या पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थक डायरेक्ट ‘जाणता राजा’ संबोधतात, त्या शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला विचारण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणावर राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

 

Web Title: Story Shivbhakt outraged over NCP Leader Nawab Maliks video MNS also asked question NCP.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x