22 January 2025 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

सावरकरांचे योगदान मोठं आहे, पण स्वातंत्र्य चळवळीत RSS कुठे होता? - शिवसेना

Veer Savarkar, RSS, Sangha parivar, Saamana Newspaper, Shivsena

मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत फडणवीसांनी लिहिलेल्या दोन पत्रांचं काय झालं? या पत्रांची केंद्रान दखल न घेणे हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचा अपमान आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे. याच अग्रलेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यात आलं आहे. २००२ पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘तिरंगा ध्वज’ राष्ट्रध्वज का मानला नाही? असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाची सावरकरांविषयीची भूमिका वेगळी आहे. त्यामुळं सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्तानं भाजपनं काल विधानसभेत सावरकर गौरव प्रस्ताव आणून सरकारकडं ठराव करण्याची मागणी केली. त्यातून आघाडीत विसंवाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी नियमावर बोट ठेवून हा प्रस्ताव फेटाळला आणि भाजपचा डाव फसला. मात्र, भाजपच्या या भूमिकेमुळं शिवसेना संतापली आहे. ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेनं वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

News English Summery: The BJP and Rashtriya Swayamsevak Sangh have been criticized in the lead-up to the match, which is the mouthpiece of the Shiv Sena. Under the headline ‘Veer Savarkar’s shield, BJP’s Pulaka Khota’, the prominent leader Devendra Fadnavis along with other BJP leaders have been targeted. Savarkar has been criticized by the media for not being a matter of respect or reverence for the BJP but as a matter of politics. What happened to the two letters Fadnavis wrote about giving Bharat Ratna to Savarkar? It has been criticized from the media that it is an insult to Maharashtra and to Veer Savarkar for not taking central note of these letters. The Rashtriya Swayamsevak Sangh has also been targeted in this same document. Why did the Rashtriya Swayamsevak Sangh not accept the national flag as the flag till 2002? This question has been asked in the foregoing.

 

Web Title: Story Shivsena mouthpiece Saamana Newspaper attacks BJP and RSS over politics on Veer Savarkar.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x