17 April 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका...हे बरे झाले: शिवसेना

Raj Thackeray, MP Sanjay Raut, Saamana Newspaper

मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेच शिवसेनेने बुधवारी वाभाडे काढले. मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. राज्यात १०५ आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले असे सांगत नाव न घेता मनसेवर टीका करण्यात आली.

महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. ‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले, असं म्हणत शिवसेनेने मनसेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून मनसेवर टीका केली.

‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले. पुन्हा ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता, अशी टोलेबाजीही अग्रलेखात करण्यात आली आहे.

 

News English Summery: In view of the current state of opposition in Maharashtra or in the country, the experiment of ‘Shadow’ cabinet means that this game should not be used as a shadow ‘, said MNS chief Raj Thackeray. In particular, the mention of MNS and Raj Thackeray has been avoided in the entire foreword. The shadow cabinet, appointed to curb the ‘Thackeray government’ in Maharashtra, has taken the news out of a match. It is said that the ‘Shadow Cabinet’ is a joke.

 

News English Title: Story Shivsena MP Sanjay Raut slams MNS over formation of Shadow Cabinet against Maha Vikas Aghadi

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या