20 April 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

सेनेचं प्रशासकीय अज्ञान? रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांच्या विशेष नियुक्त्या रद्द

Shivsena, Resignation, MP Arvind Sawant, MLA Aravindra Waikar

मुंबई: अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वाईकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती करण्यात आल्यानंतर दोन्ही लाभाची पदं असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य शासनाने अध्यादेश काढून ही नियुक्ती केली होती. अध्यादेशात रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख वादाचे कारण बनलं होतं. “ऑफिस ऑफ प्रॉफिट” या नियमानुसार भाजपाकडून आक्षेप घेतला जाण्याची वा न्यायालयात धाव घेण्याची कुणकुण लागताच शिवसेना सावध झाली होती आणि आधीच राजीनामा देखील घेतला होता. मात्र यामुळे शिवसेनेचं प्रशासकीय अज्ञान समोर आल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.

वाद निर्माण होण्याची कुणकुण लागल्याने वायकर आणि सावंत यांनी अजून पदभार स्वीकारलेला नव्हता. पण त्यांच्या पदांवर आक्षेप घेत वाद निर्माण झाल्यास राजीनाम्याची नामुष्की ओढवण्याची स्थिती निर्माण झाली, तर सावध उपाययोजना म्हणून दोघांकडून बॅक डेटेड राजीनामे घेतले गेल्याची जोरदार चर्चा आधीच रंगली होती. किंवा सुधारित अध्यादेश काढून यांना संबंधित पदांवर कायम ठेवता येईल का? याबाबतची चाचपणी सुरु होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अशा पद्धतीची पदे निर्माण करण्यास सुरुवातीपासून विरोध होता अशी चर्चा मंत्रालयात सुरु होती.

संबंधित पदांचा स्वीकार करण्यापूर्वीच दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती. मात्र आता तेच बॅनर तातडीने उतरविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र आता या दोन्ही नाराज नेत्यांचं शिवसेना पुनर्वसन कसं करणार ते पाहावं लागणार आहे.

 

News English Summery: MP Arvind Sawant was appointed as the Chairman of the Maharashtra State Parliamentary Coordination Committee while MLA Ravindra Waikar was appointed as the Chief Coordinator of the Chief Minister’s Office. However, after being appointed, both the beneficiaries were alleged to have positions. Therefore, Arvind Sawant is said to be the Chairman of Maharashtra State Parliamentary Coordination Committee, while Ravindra Waikar has been canceled as the Chief Coordinator of the Chief Minister’s Office.

 

Web Title: Story Shivsena take resignation of MP Arvind Sawant and MLA Aravindra Waikar from minister status.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या