20 April 2025 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

महाविकास आघाडी सरकार सुद्धा पडणार असं सांगणाऱ्या भाजप नेत्यांना मुडेंचं प्रतिउत्तर

Madhya Pradesh, Kamalnath Government, Minister Dhananjay Munde

मुंबई: मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारवर आलेल्या ज्योतिरादित्य संकटामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री कलनाथ यांच्याकडे राजीनामे सोपवले. यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा मंजूर करताच त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली. यानंतर मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण सरकार अल्पमतात आहे हे मान्य करायला कमलनाथ मात्र तयार नाहीत.

मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच अनेक नेत्यांची आघाडी सरकारमध्ये कुचंबणा होत आहे. हे नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपला येऊन मिळतील, असे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

मात्र मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील असा टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूंकप होईल असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. त्यावर उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी भाजपाला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही असं म्हटलं आहे.

 

News English Summery: BJP leaders are claiming that there will be a political earthquake in Maharashtra after the political earthquake in Madhya Pradesh. However, social justice minister Dhananjay Munde has said that BJP will not possible to create a situation like Madhya Pradesh. BJP leaders are claiming that there will be a political earthquake in Maharashtra after the political earthquake in Madhya Pradesh. Responding to this, Dhananjay Munde has said that BJP cannot enjoy it in Maharashtra.

 

Web News Title: Story state minister Dhanjay Munde reaction on Madhya Pradesh turmoil in congress government and impact on Mahavikas Aghadi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या