23 February 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कानाखाली मराठी सुविचार काढण्याच्या इशाऱ्यानंतर निर्मात्याला महाराष्ट्राची राजभाषा आठवली

Tarak Mehata Ka Ulta Chashma, producer Asit Modi, SAB TV Channel

मुंबई: सब टीव्ही वाहिनीवरील ‘तारक मेहता का उलटा चस्मा’ या मालिकेत एका संवादात मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी असल्याचं म्हटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. यावर मनसेच्या अनेक नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सब टीव्ही वहिनीला सज्जड दम भरला होता. यावर त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली ‘सुविचार’ लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत!. ‘कानाखाली काढलेले मराठी सुविचार’ ह्यांना बरोबर वाचता येतील, असं म्हणत गंभीर इशारा दिला होता.

मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी…आपल्या ट्विटर अकाऊंटवरमुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटते असं मत मांडलं होतं.

तसेच मनसे कार्यकर्त्यांनी यावर “तारक मेहताचा उलटा चष्मा” सरळ करावा लागेल म्हणजे त्यांना मुंबईची भाषा कोणती ते स्पष्ट दिसेल असं म्हटलं आहे. यावर सब टीव्ही वाहिनीकडून अजून प्रतिक्रिया आली नसली तरी मनसे यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील वादावर, निर्माते असित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे यात काही वादच नाही…आपण सर्व भारतीय आहोत आणि मी सर्व भाषांचा सन्मान करतो” असं ट्विट करत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

 

News English Summery: Producer Asit Modi has clarified on his Twitter account that Tarak Mehta has been in talks for the inverse glasses series. “Mumbai is in Maharashtra and Marathi is the official language of Maharashtra. There is no controversy … we are all Indians and I respect all languages”. In a recent episode, a series of dialogues have shown that the language of Mumbai is spoken by Bapuji, Jethlal’s father. In the broadcast area, each person also communicates with his mother tongue. Bapuji mediates the character in the dialogue created and engages everyone. Meanwhile … In the face of Bapuji, dialogue has been shown that the language of Mumbai is Hindi.

 

Web News Title: Story Tarak Mehata Ka Ulta Chashma producer Asit Modi issue statement on Hindi language issue.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x