21 November 2024 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

राज्यातून पुण्यात ८ तर मुंबईत २ कोरोनाग्रस्त रुग्ण : मुख्यमंत्री

Chief Minister Uddhav Thackeray, Corona Virus, Positive Cases

मुंबई, ११ मार्च : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहे. हे १० जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, पण ते गंभीर नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच आठवड्यात गुंडाळणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मात्र, त्यांना त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणं दिसतं नाही. एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला म्हणजे घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, याबाबत दक्षता घेणं गरजेचं आहे. १ मार्च रोजी एक पर्यटकांचा ग्रुप परदेशातून राज्यात आला त्यांच्यामार्फतच राज्यात हे संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. या लोकांच्या संपर्कात आलेल्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. पुण्यात ८ जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यांपैकी काहींमध्ये विशेष लक्षणंही दिसून आलेली नाहीत. मुंबईत देखील यांच्याशी संपर्कात आलेल्यांना करोनाची बाधा झाली आहे. मुंबईत ६ संशयीत आढळून आले होते त्यांपैकी ४ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या असून २ जण पॉझिटिव्ह आहेत.

पुण्यातील ज्या परिसरातील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्या परिसरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र सध्याच्या घडीला घाबरुन जाऊन असा कोणताही निर्णय घेण्याची गरज नाही. सरकारकडून दर दोन तासांनी यासंबधीचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज येत्या शनिवार किंवा रविवारपर्यंत आटोपते घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे अधिवेशनात असेलेले लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवता येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

News English Summery: A total of 10 people have been infected with coronas in the state so far, Chief Minister Uddhav Thackeray told a press conference in Mumbai. Treatment is underway at 8 patients at Naidu Hospital in Pune and 2 patients at Kasturba Hospital in Mumbai. He said that the nature of all patients was stable. The couple, who returned from Dubai, have been searched after all the passengers along with Corona, they said. All the coronary patients found so far have been in contact with each other. Uddhav Thackeray also appealed that citizens should not be scared by the numbers as patients’ symptoms are mild. It was also demanded that school colleges in Pune area should take a vacation. However, there is no need to panic at the present time and take such a decision. The government is reviewing this every two hours. The Chief Minister said that an appropriate decision will be taken after reviewing the situation in the next two days.

 

News English Title: Story ten positive cases of Corona Virus found in Maharashtra including 8 positive cases in Pune and 2 Mumbai says Chief Minister Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x