मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद: मुख्यमंत्री
मुंबई, १३ मार्च: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. जनतेच्या हितासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता शालेय परीक्षा उशिरा घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत करोनाबाबतचं निवेदन दिलं. राज्यात करोनाचे एकूण १७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दहा रुग्ण पुण्यातील आहेत. मात्र, या १७ रुग्णांमधील करोनाची लक्षणं गंभीर नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जिम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. करोनाचा राज्यात फैलाव नाही. मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुण्यातही नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. पुढचे १४ दिवस काळजी घ्यायला हवेत, म्हणून निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“जनतेमध्ये भीती आहे म्हणून १० वी आणि १२ वी च्या परीक्षांव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील शाळा आपण पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/9tCaRC3BLv— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 13, 2020
“रेल्वे आणि बस अत्यावश्यक सेवा असल्याने बंद करु शकत नाही. तसंच धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय तसंच क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ नयेत. अशा कार्यक्रमांसाठी सरकारकडून परवानगी दिली जाणार नाही. परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल. खासगी कंपन्यांना शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी.
जिथं जिथं शक्य आहे, तिथं खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन राज्य सरकारने कंपन्यांना केले आहे. तसेच, नागरिकांना घाबरून जायचं काहीही कारण नाही. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्णय घेण्यात आले आहेत. आपल्या राज्यातील परिस्थिती अजिबात गंभीर नसून आपण आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाचं पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ज्या देशांची यादी केंद्र सरकारने दिली आहे त्यामध्ये अमेरिका आणि दुबईचा समावेश नव्हता. पण आपल्याकडे सापडलेले रुग्ण तेथून आलेले आहेत. त्यामुळे आपण केंद्र सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहोत”. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर व्यवस्था करण्यात आली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
News English Summery: Chief Minister Uddhav Thackeray has made a very important announcement in the wake of 17 cases of coronary disease in the state. Chief Minister Uddhav Thackeray announced in the Legislative Assembly today that Mumbai, Navi Mumbai, Thane, Pune, Pimpri Chinchwad and gym, cinema halls, swimming pools and theaters were closed at midnight. He also urged the citizens not to travel by train or bus without any reason. Chief Minister Uddhav Thackeray made a statement in the Legislative Assembly today. A total of 17 coronary patients have been found in the state. Ten of them are from Pune. However, in these 17 patients, the symptoms of coronary disease are not severe. They are undergoing treatment, Chief Minister Uddhav Thackeray said. He also announced that the gyms, cinemas, swimming pools and theaters in Nagpur, Mumbai, Navi Mumbai, Thane, Pimpri Chinchwad and Nagpur will be closed from midnight onwards. There is no spread in the state of Corona. Not in Mumbai, Thane, Nagpur and even in Pune. However, this decision is being taken as a precautionary measure. The next 14 days have to be taken care of, he said.
Web News Title: Story theater swimming pool and gym will closed from today midnight Chief Minister Uddhav Thackeray announcement.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय