18 January 2025 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

वांद्रे गर्दी प्रकरण: उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक

Uttar Bharatiya panchayat, Vinay Dubey, Corona Crisis, Covid19

कल्याण, १५ एप्रिल: वांद्रे गर्दी प्रकरणी पोलिसांनी उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक केली आहे. मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी १८ एप्रिलपर्यंत रेल्वेची सोय करुन दिली नाही तर देशव्यापी आंदोलनाचा इशारा विनय दुबेने दिला होता. मुंबई पोलिसांनी आंदोलनाचा इशारा आणि अफवा पसरवल्याप्रकरणी विनय दुबे याला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.

विनय दुबे याने परप्रातीयांना भडकवणारा व्हिडीओ शेअर करत आंदोलन पुकारण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत ऐरोली येथून त्याला ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर विनय दुबे याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतचे काही फोटो व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांनी आपली उत्तर भारतीय विरोधी भूमिका थोडीशी मवाळ केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित केलं होतं. डिसेंबर २०१८ मध्ये पार पडलेल्या या मेळाव्याचं संयोजक इतर कोणी नाही तर विनय दुबे हाच होता. विनय दुबे याच्या फेसबुक अकाऊंटवर स्टेजवर राज ठाकरेंसोबत उपस्थित असतानाचे फोटो आहेत.

विनिय दुबेला पोलिसांनी नवी मुंबईतील ऐरोली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अफवा पसरवणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, नागरिकांना एकत्र जमवणे याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विनय दुबेला आज स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

News English Summary: Police have arrested Vinay Dubey, the president of the North Indian general, in the Bandra crowd. Vinay Dubey warned of a nationwide agitation if the railway was not provided for the laborers till April 18. Mumbai police arrested Vinay Dubey late on Tuesday night for warning and spreading rumors.

News English Title: Story Vinay Dubey arrested by Mumbai police for threatening a huge protest by migrant labourers in Kurla Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x