आपत्ती व्यवस्थापनाचा एवढा अनुभव असेल तर घेऊन जा त्यांना हुआन, इटली, स्पेनला...भाजपला झोडपलं
मुंबई: राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून रुग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवले तर हे शक्य होणार आहे. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
सदर बैठकीत राज्यातील शासकीय कार्यालय एक दिवसाआड पध्दतीने रोज ५० टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस आणि मेट्रो या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी या क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कोरोनच्या आपत्तीमध्ये सरकारी पातळीवर अनेक उपाय केले जातं असून त्यासाठी बैठकांचा देखील सपाटा लागल्याचं पाहायला मिळत आहे. स्वतः मुख्यमंत्री त्याबाबत सामान्यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सतर्क करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना ही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आपत्ती असून त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहून सरकारी यंत्रणांना सहकार्य करणं हाच उत्तम उपाय आहे.
मात्र यावर देखील भाजपचे आमदार राजकारण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवावर बोट ठेवून, अनुभवी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याला गरज असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांना गेल्या पावसाळ्यात उदभवलेल्या पूर परिस्थितीत अनुभवी फडणवीसांनी काय दिवे लावले होते ते सर्व महाराष्ट्राने अनुभवल्याचा विसर पडला असावा.
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे.#MaharashtraNeedsDevendra
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) March 19, 2020
दरम्यान, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मात्र आमदार निरंजन डावखरे यांना ट्विट करून शालजोडीतले हाणल्याच पाहायला मिळत आहे. वरुण सरदेसाई यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘ह्या असल्या राजकारण्यांना पहिले quarantine केले पाहिजे. काय उपयोग शिक्षणाचा जर शहाणपण नसेल? एवढाच अनुभव आहे आपत्ती व्यवस्थापनात तर घेऊन जा तुमच्या नेत्यांना Wuhan, Spain किंवा Italy मध्ये……तसेही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे तुमचा.
ह्या असल्या राजकारण्यांना पहिले quarantine केले पाहिजे. काय उपयोग शिक्षणाचा जर शहाणपण नसेल?
एवढाच अनुभव आहे आपत्ती व्यवस्थापनात तर घेऊन जा तुमच्या नेत्यांना Wuhan, Spain किंवा Italy मध्ये.तसेही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे तुमचा. https://t.co/fzhsNYyOt2
— Varun Sardesai (@SardesaiVarun) March 19, 2020
News English Summery: Corona disasters are taking a number of measures at the government level, and meetings for this are also seen. The Chief Minister himself is seeing that the media is alerting the people through the media. Corona is an international and national disaster and the best way for everyone to work together is to co-operate with the government. However, it is also seen that BJP MLAs are doing politics. BJP Legislative Council MLA Niranjan Davkhare has said that the state needs the veteran former Chief Minister Devendra Fadnavis, putting his finger on Chief Minister Uddhav Thackeray’s experience of disaster management. Meanwhile, Maharashtra MLA Niranjan Dawakhare may have forgotten all the experiences of the veteran Fadnavis in the flood situation which had brought them light. Meanwhile, Yuva Sena leader Varun Sardesai, has slammed over tweet to BJP MLA Niranjan Dawakhare.
News English Title: Story Yuvasena Leader Varun Sardesai slams BJP MLA Niranjan Davkhare over statement regarding Corona crisis management News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER