सुनील पाटीलचा गौप्यस्फोट | मनिष भानुशालीकडील यादीत आर्यन खानचं नाव नव्हतं | मग आर्यन अडकला कसा?

मुंबई, 07 नोव्हेंबर | सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील (Sunil Patil Allegations) यांनी म्हटलंय.
Sunil Patil Allegations. Aryan Khan’s name was not mentioned in the drug party note he received on the cruise. Also something might feel wrong. The inquiry committee should inquire into the matter, said Sunil Patil :
मनिष भानुशालीने जी नावं पाठवली होती, त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं. काही तरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने चौकशी करावी. 1 तारखेला मला मनिष भानुषालीने यादी पाठवली होती. ही लिस्ट मला सॅम्युअल डिसूजाला द्यायची होती. पण त्या लिस्टमध्ये आर्यनचं नाव नव्हतं. ही लिस्ट मी पत्रकार आणि एजन्सीला देणार आहे. माझ्याकडे व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि रेकॉर्डिंगचा पुरावा आहे. लिस्ट व लोकेशन आहे माझ्याकडे,” असं सुनिल पाटील म्हणाले.
तसेच पुढे बोलताना, “मी दिलीप वळसे पाटीला यांनी भेटलेलो नाही. अनिल देशमुख यांना फक्त एकदाच भेटलो. त्यानंतर त्यांची आणि माझी भेट नाही. मी ट्रान्सफरचे रॅकेट चालवतो, असा आरोप केला जातो. पण तसे काही नाही. मला या प्रकरणात फसवण्यात आले आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पोहिजे. मी सह्याद्री येथे कधीही गेलेलो नाही. सीसीटीव्ही फुटेजची चौकशी झाली पाहिजे. माझी आणि नवाब मलिक यांची भेट झालेली नाही. मलिक आणि माझं दहा तारखेला बोलणं झालं. मला अडकवण्यात येईल असं मी त्यांना सांगितलं आणि झालंही तसंच, असे सुनिल पाटील म्हणाले.
आर्यन खान आणि समीर खान यांना NCB समोर हजार राहावं लागणार:
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि मंत्री नवाब मलिकांचा जावई समीर खान यांना NCB च्या SIT समोर चौकशीसाठी हजर रहावं लागण्याची शक्यता आहे. NCB ने स्थापन केलेल्या SIT मध्ये IPS अधिकारी संजय कुमार सिंग यांच्या समितीने जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे.
मुंबई NCB शी संबंधित सहा प्रकरणांमध्ये या SIT ने जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे. आम्ही या प्रकरणांमध्ये आमच्या तपासाला सुरुवात केली आहे अशी माहिती संजय कुमार सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Sunil Patil Allegations over Aryan Khan case involvement.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE