सॅम मला म्हणाला होता मी NCB ऑफिसरला 25 लाख दिले आणि माझं काम झालं | सुनील पाटीलच्या गौप्यस्फोटातील तो अधिकारी कोण?
मुंबई, 07 नोव्हेंबर | सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील (Sunil Patil exposed Sam D’souza NCB connections) यांनी म्हटलंय.
Sunil Patil exposed Sam D’souza NCB connections. When Sam spoke to me, he said that I have paid Rs. 25 lakhs to the NCB officer and I am done said Sunil Patil :
मनिष भानुशालीने जी नावं पाठवली होती, त्यात आर्यन खानचं नाव नव्हतं. काही तरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने चौकशी करावी. 1 तारखेला मला मनिष भानुषालीने यादी पाठवली होती. ही लिस्ट मला सॅम्युअल डिसूजाला द्यायची होती. पण त्या लिस्टमध्ये आर्यनचं नाव नव्हतं. ही लिस्ट मी पत्रकार आणि एजन्सीला देणार आहे. माझ्याकडे व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि रेकॉर्डिंगचा पुरावा आहे. लिस्ट व लोकेशन आहे माझ्याकडे,” असं सुनिल पाटील म्हणाले.
नेमकं काय म्हणाले सुनील पाटील?
सुनील पाटील-मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही, क्रूझ पार्टीची टीप मनिष भानुशालींकडे आली होती. नीरज यादव हे भाजपचे नेते आहेत. ते कैलाश विजयवर्गीय यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मला फोन केला होता. त्यावेळी मी आणि मनिष अहमदाबादला होतो. त्यावेळी कॉर्डिलियाला मोठी पार्टी होणार आहे आणि छापा पडणार आहे असं सांगण्यात आलं आहे. मी त्या पार्टीत सहभागी व्हायला नकार दिला. के. पी. गोसावीही तेव्हा दुसऱ्या हॉटेलवर थांबला होता.
मी समीर वानखेडेंना ओळखत नाही. त्यांच्याशी माझं एक सेकंदही बोलणं झालेलं नाही. के.पी. गोसावी आणि मनिष हे गांधीनगरला मंत्रालयात गेले होते. ही बाब एक ऑक्टोबरची आहे. संध्याकाळी चार वाजता नकार दिला. तर ८.३० च्या दरम्यान मी मनिषला फोन केला त्याला विचारलं कुठे आहात? तर त्याने मला सांगितलं की आम्ही आयबीचे सहेब आहेत जडेजा म्हणून त्यांच्यासोबत बसलो आहोत.
किरणने मला तसाच मेसेज केला. त्यानंतर रात्री नऊ वाजता हे दोघे रूमवर आले. त्यानंतर मनिष आणि नीरज यादव यांचं बोलणं झालं. मी तेव्हाही म्हटलं की मला या कुठल्या भानगडीत पडायचं नाही. मला टीप द्यायचीही नाही आणि मला ते ऐकायचंही नाही. समीर वानखेडे तुझा मित्र आहे का? असं मला विचारण्यात आलं. मी सांगितलं मी त्यांना ओळखत नाही. माझा सीडीआर काढा. वानखेडे सरांच्या फोनमध्ये माझा एक मेसेज मिळेल काँग्रएट्स केल्याचा. मला सॅम डिसूझाने नंबर पाठवला होता आणि सांगितलं होतं की रेड केली आहे म्हणून एक मेसेज कर. त्यामुळे मी मेसेज केला असं सुनील पाटील यांनी सांगितलं.
एनसीबीच्या ऑफिसरला 25 लाख रूपये दिले आहेत माझं काम झालं:
सॅमचं नाव सॅनविल डिसूझा आहे. विजय ठाकूर आमचा कॉमन मित्र आहे त्याच्या मार्फत आमची ओळख झाली होती. मला चार महिन्यांपूर्वी सॅमने एक समन्स व्हॉट्स अॅपवर पाठवला होता. व्यवसाय प्रकरणात मला ड्रग्ज प्रकरणी समन्स आलं आहे. मला पैशांची मदत हवी आहे असंही सांगितलं आहे. मला पाच ते दहा लाख रूपये देशील का? मी म्हटलं माझी अडचण आहे मी पैसे देऊ शकत नाही आणि कुणालाही ओळखत नाही. नंतर सॅम माझ्याशी बोलला तेव्हा म्हणाला की मी एनसीबीच्या ऑफिसरला 25 लाख रूपये दिले आहेत माझं काम झालं आहे.
किरण आणि मनिषला मी सांगितलं की एनसीबीसोबत सॅमचा कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे त्यांचे नंबर दिले, मला सांगत होते की तू पण चल. मी म्हटलं मी नाही येणार, मला काम आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Sunil Patil exposed Sam D’souza connections with NCB.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा