22 April 2025 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत बैठका

Sushant Singh Rajput case, Mumbai police commissioner, Parambir Singh, Supreme Court

मुंबई, १९ ऑगस्ट : सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश देताना प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी कोणतंही चुकीचं काम केल्याचं सूचवत नसल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास केला असून एफआयआर दाखल केला नसल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणलं.

सर्वोच्च न्यायालयाने यावेळी बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्याच्या मुंबई पोलिसांचा निर्णय अयोग्य असल्याचं सांगत हे टाळता आलं असतं असंही सांगितलं. यामुळे तपासाबाबत संशय वाढल्याने हे टाळता येणं शक्य होतं असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं.

दरम्यान, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांत जवळपास अर्धातास चर्चा झाली. यानंतर पोलीस आयुक्त गृह मंत्री अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी गेले. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे डीजीपी सुबोध कुमार जायसवाल यांनाही भेटण्यासाठी बोलावले आहे.

दोन्हीही टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अद्याप विशेष अशी प्रतिक्रिया दिलेली नाही. बुधवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. जोवर संपूर्ण ऑर्डर वाचत नाही, तोवर यावर काहीही बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.

 

News English Summary: Police Commissioner Parambir Singh met Chief Minister Uddhav Thackeray immediately after the court’s decision. After this, the Commissioner of Police went to meet Home Minister Anil Deshmukh. Not only that, Chief Minister Uddhav Thackeray has also called on Maharashtra DGP Subodh Kumar Jaiswal to meet him.

News English Title: Sushant Singh Rajput case Mumbai police commissioner Parambir Singh meets maharashtra cm and home minister after Supreme Court C verdict News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या