15 January 2025 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

फडणवीस मुख्यमंत्री असताना असं घडलं असतं तर मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं - रेणुका शहाणे

Sushant Singh Rajput Case, Renuka Shahane, Amruta Fadnavis, Mumbai Tweet

मुंबई , ४ ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. असं असताना महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी यांनी ‘मुंबई सुरक्षित नाही’ असं म्हणतं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर ट्विट केलं आहे. या ट्विटला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सणसणीत टोला लगावला आहे.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा समाचार घेत चांगलेच फटकारले आहे. रेणुका शहाणे म्हणाल्या की, सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करु नये. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हा तुम्ही मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं, असा टोला रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणावर मीडिया आणि राजकारण्यांचा कोणताही दबाव असता कामा नये, असं मत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केले आहे.

रेणुका शहाणे कायमच घडामोडींवर आपलं मत व्यक्त करत असतात. सुशांतचा मृत्यू ही हत्या आहे की आत्महत्या असा देखील सवाल केला जात आहे? या सगळ्यावर रेणुका शहाणे आपलं मत व्यक्त केलं आहे. याच प्रकरणावर त्यांनी आदित्य ठाकरेंना देखील एक सवाल केला आहे. सुशांतच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. याबाबत त्यांनी आदित्य ठाकरेंना सवाल केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ‘नेपोटीझम’ आणि ‘बॉलिवूड गँग’ या दोन्ही अधोरेखित झाल्या आहेत. याप्रकरणातील सत्य हे जगासमोर यायलाच हवं अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

News English Summary: Actress Renuka Shahane has hit out at Amrita Fadnavis’ tweet. Renuka Shahane said that Sushant’s death should not be politicized. If such an incident had taken place when Devendra Fadnavis was the Chief Minister, then you would not have tweeted like this about Mumbai, said Renuka Shahane to Amrita Fadnavis.

News English Title: Sushant Singh Rajput Case Renuka Shahane On Amruta Fadnavis Mumbai Tweet News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x