15 January 2025 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

आदित्य ठाकरे यांचं नाव खराब करणं हा विरोधकांचा अजेंडा - अनिल परब

Sushant Singh Rajput death, CBI inquiry, Minister Anil Parab

मुंबई, १९ ऑगस्ट : सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश देताना प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी कोणतंही चुकीचं काम केल्याचं सूचवत नसल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास केला असून एफआयआर दाखल केला नसल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणलं.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णायानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेने राज्यांना दिलेल्या अधिकाराला धक्का लागू नये, म्हणून तपास राज्याकडे असावा, अशी मागणी आम्ही केली होती. सीबीआयकडे तपास देण्यास विरोध केला नव्हता, असं अनिल परब म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांचं नाव खराब करणं हा विरोधकांचा अजेंडा आहे. सरकार आले नाही म्हणून पोटशूळ उठला आहे. सरकार चांगलं चाललं आहे, त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. विरोधक काय म्हणतात, यापेक्षा घटना काय म्हणते याला आम्ही महत्त्व देतो. याप्रकरणी राजकारण करणं एवढंच विरोधकांचं काम आहे, अशी टीका परब यांनी केली आहे.

पुढे अनिल परब म्हणाले की, कोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपासाला चुकीचं म्हटलं नाही. या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देऊ की नाही यावर आम्ही निर्णय घेऊ. महाराष्ट्र सरकारचं फक्त असं म्हणणं होतं की या खटल्याची चौकशी मुंबई पोलिसांना द्यावी आणि आवश्यक असल्यास हा खटला नंतर सीबीआयकडे पाठवावा. ही घटना मुंबईत घडली असल्याने मुंबई पोलिसांनी याची चौकशी करायला हवी होती असं त्यांनी सांगितले. तसेच पार्थ पवारांनी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीबाबत तेच सांगू शकतील, ते सरकारचा भाग नाहीत, त्यामुळे त्यांच्या मागणीवर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही, असं अनिल परब म्हणाले.

 

News English Summary: Defaming Aaditya Thackeray is the agenda of the opposition. The stomach ache has risen as the government has not come. The government is doing well, so there is a conspiracy to discredit the government. We value what the event says rather than what the opponents say.

News English Title: Sushant Singh Rajput death CBI inquiry Minister Anil Parab reaction News latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x