17 April 2025 12:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याने त्याचे वडिलांशी चांगले संबंध नव्हते - संजय राऊत

Sushant Singh Rajput, His father, Shivsena MP Sanjay Raut

मुंबई, ०९ ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या तपासाबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. एवढंच ‘नाहीतर मुंबई पोलिसांमध्ये . बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली’ असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन भाजप, बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर काही प्रश्न उपस्थितीत केले आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे’ असं म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला आहे.

 

News English Summary: In the case of Sushant Singh Rajput, the Bihar government had no reason to fall. Sushant’s father lives in Patna. His relationship with his father was not good. Sushant did not approve of his father’s second marriage. As a result, he lost his emotional connection with his father.

News English Title: Sushant Singh Rajput did not have good relationship his father said Shivsena leader MP Sanjay Raut News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या